दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वत:चे फोटो, व्हिडीओ आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मराठीसह तिने हिंदीमध्येही काम केलं आहे. -
'..आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटात वैदेहीने कांचन घाणेकर यांची भूमिका साकारली होती.
या भूमिकेतून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांच्या 'सिम्बा' चित्रपटात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. वैदेहीने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलं आहे. 'वजीर' सिनेमात तिने बिग बींसोबत भूमिका साकारली होती. या सिनेमात तिची छोटी भूमिका होती. पण बिग बींसोबत स्क्रीन शेअर केल्याने वैदेहीचं प्रचंड कौतुक झालं होतं. -
वैदेही मोजक्या भूमिका करते, मात्र त्यातही ती छाप सोडून जाते. वैदेहीचं सोज्वळ सौंदर्य प्रेक्षकांना फार भावतं. -
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/वैदेही परशुरामी
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/वैदेही परशुरामी
-
छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/वैदेही परशुरामी
वैदेही परशुरामीचं सोज्वळ सौंदर्य
मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही तिने छाप सोडली आहे.
Web Title: Vaidehi parshurami beautiful photos marathi actress ssv