निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चर्चेत राहण्यामागचं कारण म्हणजे सईने पहिल्यांदाच रॅम्प वॉक केलाय. 'लॅक्मे फॅशन वीक २०२०'साठी सई शो स्टॉपर झाली आहे. या फॅशन शोमध्ये सईचा 'ब्राइडल लूक' चांगलाच चर्चेत राहिला. गेल्या वर्षी सईने 'दबंग ३' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं. सलमान खानने सईला बॉलिवूडमध्ये लाँच केलं. सई मांजरेकर बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सना टक्कर देताना दिसतेय. -
सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ब्राइडल लूक'चे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून लाइक्स मिळत आहेत.
महेश मांजरेकरांची लेक ठरली ‘शो स्टॉपर’
सई मांजरेकर बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सना टक्कर देताना दिसतेय.
Web Title: Mahesh manjrekar daughter saiee manjrekar debut walk at the lakme fashion week 2020 ssv