दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या सोशल मीडियावर खूपच एक्टिव असते. दीपिकाने लग्नानंतर पहिल्यांदाच हॉट फोटोशूट केलं आहे. दीपिकाचे समुद्र किनाऱ्यावरील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. दीपिकानं आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या हॉट फोटोशिवाय दीपिकानं काळ्या कपड्यातील आऊटफिटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. Beauty In Black अशा कमेंट्स त्या फोटोवर येत आहेत. दीपिकाच्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत. दीपिकाच नुकताच छपाक हा चित्रपट आला होता. छपाकने बॉक्स ऑफिसवर सरासरी यश मिळवलं. ८३ या चित्रपटात दीपिका आपल्या पतीसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ’83’ या चित्रपटात दीपिका, कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. लंडनमध्ये सध्या या चित्रपटाचं शूटींग सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी २०१८ मध्ये लेक कोमा येथे डेस्टीनेशन लग्न केलं. बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल म्हणून या जोडीकडे पाहिले जाते…
Beauty In Black : लग्नानंतर दीपिकाचं पहिलंच हॉट फोटोशूट
हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.
Web Title: Deepika padukones hot photo shoot and gorgeous black outfits see pics nck