• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pallavi joshi things maybe you dont know amazing life facts about marathi actress glamorous anchor producer vjb

बालकलाकार, अभिनेत्री, सूत्रसंचालक, निर्माती… वाचा पल्लवी जोशीबद्दलच्या खास गोष्टी

पल्लवीचा आज वाढदिवस आहे

April 4, 2020 13:32 IST
Follow Us
  • अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालक पल्लवी जोशी हिचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयाने आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे तिने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. (सर्व फोटो - सोशल मीडिया)
    1/10

    अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालक पल्लवी जोशी हिचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयाने आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे तिने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

  • 2/10

    पल्लवी जोशी यांनी बालपणीच रंगमंचावर काम करणे सुरु केले. बाल कलाकार म्हणून 'बदला' आणि 'आदमी सडक का' या दोन चित्रपटात तिने अभिनय केला.

  • 3/10

    १९७९ साली प्रदर्शित झालेल्या 'दादा' या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणाऱ्या अंध मुलीची भूमिका पल्लवीने साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

  • 4/10

    झी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या अंताक्षरी या कार्यक्रमामुळे पल्लवी घराघरात पोहोचली. त्या कार्यक्रमात अनु कपूर यांच्यासह सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर तिने सारेगमप लि'ल चॅम्प्सचे ही सूत्रसंचालन केले.

  • 5/10

    पल्लवी जोशीने प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी विवाह केला. विवेक अग्निहोत्री यांनी 'चॉकलेट', 'हेट स्टोरी', बुद्धा इन ट्रॅफिक जाम' यासरख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पल्लवी आणि विवेक यांना दोन मुले आहेत.

  • 6/10

    पल्लवी जोशीने कारकिर्दीच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि शबाना आझमी यांच्यासोबत भारत एक खोज या मालिकेत काम केले.

  • 7/10

    पल्लवीने मधल्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केले. अगदी अलिकडे तिच्या पतीने दिग्दर्शित केलेल्या बुद्धा इन ट्रॅफिक जॅम या चित्रपटात तिने अभिनय केला.

  • 8/10

    पल्लवीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. अल्पविराम या मालिकेतील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले.

  • 9/10

    पल्लवीने असंभव आणि अनुबंध या झी मराठीवरील दोन मालिकांची निर्माती म्हणून काम पाहिले. या दोनही मालिका चांगल्याच गाजल्या.

  • 10/10

    पल्लवीला सोशल मीडियाची संकल्पना आवडत नसल्याने ती प्रसिद्धीझोतात येत नाही, मात्र काही मुद्द्यांवर ती आवर्जून व्यक्त होते.

Web Title: Pallavi joshi things maybe you dont know amazing life facts about marathi actress glamorous anchor producer vjb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.