-
अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी याने नुकतंच छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. (सर्व छायाचित्र सौजन्य: इन्स्टाग्राम/ विराजस कुलकर्णी)
'माझा होशील ना' या मालिकेत विराजस गौतमी देशपांडेसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. 'हॉस्टेल डेज', 'माधुरी' अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्य विराजसने 'ती आणि ती' या चित्रपटाचं लेखनही केलं. -
लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा तिहेरी भूमिका तो चांगल्यारित्या पार पाडत आहे.
-
थिएटरॉन या नाट्यसंस्थेच्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग', 'मिकी', 'भंवर' अशा प्रायोगिक नाटकांत लेखन, दिग्दर्शन तसंच अभिनयही त्यानं केला.
-
अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात जास्त रमतो, असं तो म्हणतो.
विराजसे फिल्म मेकिंगचं शिक्षणही घेतलं आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिनही भाषांमध्ये विराजस लेखन करतो. स्टारकिड असूनही मला वशिला हा प्रकार आवडत नाही, असं तो स्पष्ट सांगतो. -
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराजस म्हणाला, "एका वेळी चार मालिका करून, थकून घरी आल्यावर एकही शब्द न बोलता झोपणाऱ्या आईला मी पाहात आलोय, त्यामुळे ग्लॅमरने हुरळून न जाता त्यामागे किती कष्ट असतात हे समजलं."
कामाचं नियोजन कसं करायचं यासाठी आईच्या सल्ल्याचा फायदा होतो, असं तो म्हणाला. -
लहानपणापासूनच त्याच्या आजोबांना, जयराम कुलकर्णी यांना काम करताना तो बघतोय. त्यांच्या कामाचा अंश त्यानं नक्कीच घेतला आहे, असं मृणाल कुलकर्णी विराजसच्या अभिनयाविषयी म्हणतात.
त्यानं हे स्वबळावर मिळवलं आहे असंही त्या अभिमानाने सांगतात. -
मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो. नी. दांडेकर, सासरे जयराम कुलकर्णी, स्वत: मृणाल कुलकर्णी आणि आता त्यांचा मुलगा विराजसच्या रुपानं कुटुंबातील चौथी पिढी कलाविश्वात आहे.
-
'माझा होशील ना' या मालिकेतील विराजसच्या अभिनयाचं फार कौतुक आहे.
-
गौतमी आणि विराजसच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होत आहे.
छायाचित्र सौजन्य : इन्स्टाग्राम/ विराजस कुलकर्णी
स्टारकिड असूनही स्वबळावर स्वत:चं स्थान निर्माण करणारा विराजस कुलकर्णी
“एका वेळी चार मालिका करून, थकून घरी आल्यावर एकही शब्द न बोलता झोपणाऱ्या आईला मी पाहात आलोय, त्यामुळे ग्लॅमरने हुरळून न जाता त्यामागे किती कष्ट असतात हे समजलं.”
Web Title: Sonpari fame mrinal kulkarni son virajas kulkarni know about him ssv