प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्री राणी चटर्जीने फेसबुकवर एका व्यक्तीच्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्याबरोबर तिने लिहिले, 'हा माणूस मला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत आहे.' संबंधित व्यक्ती तिला शिव्या देत असल्याचंही तिने यात म्हटलं. त्या व्यक्तीमुळे नैराश्यात असल्याचंही तिने म्हटलं. राणीने या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांकडून मदत मागितली आहे. 'मदत न मिळाल्यास मी आत्महत्या करेन. कारण आता मी थकले आहे', अशा शब्दात राणीने फेसबुकवर तिची व्यथा मांडली आहे. -
राणी चटर्जी ही भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली. अशातच राणीच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. राणीच्या या पोस्टला मुंबई पोलीस काय उत्तर देतायत, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्व छायाचित्र सौजन्य : फेसबुक/ राणी चटर्जी
“…तर आत्महत्त्या करेन,” असं म्हणणारी अभिनेत्री राणी आहे तरी कोण?
Web Title: Depressed will commit suicide bhojpuri actress rani chatterjee social media post ssv