• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bjp subramanian swamys letter to pm modi in sushant singh rajputs demise sgy

“सुशांत सिंह प्रकरणात नाव येऊ नये यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज दुबईमधील डॉनच्या संपर्कात”, मोदींना पत्र

सुब्रहमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला असतानाही अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. सुशांत सिंहच्या आत्महत्येमागे वेगवेगळे तर्क लढवले जात असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना जबाबदार ठरवलं जात आहे.
    1/11

    अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला असतानाही अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. सुशांत सिंहच्या आत्महत्येमागे वेगवेगळे तर्क लढवले जात असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना जबाबदार ठरवलं जात आहे.

  • 2/11

    सुब्रमण्यम स्वामी

  • 3/11

    पत्रात सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुंबईतील आपल्या सुत्रांकडून सुशांतचा मृत्यू आत्महत्या दाखवत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला आहे.

  • 4/11

    तसंच बॉलिवूडमधील अनेक मोठे सेलिब्रेटी दुबईमधील डॉनच्या मदतीने मुंबई पोलिसांना प्रकरण मिटवायला सांगत, ही ऐच्छिक आत्महत्या असल्याचं दाखवण्यास सांगत आहेत असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

  • 5/11

    “तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची कल्पना आहेच. माझे सहकारी इशकराम भंडारी यांनी सुशांत सिंहच्या कथित आत्महत्येच्या परिस्थितीसंबंधी रिसर्च केला आहे. पोलीस एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांत सिंहने कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली याचा तपास करत आहेत. पण मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचे दुबईतील डॉनशी संबंध आहेत ते पोलिसांकडून ही ऐच्छिक आत्महत्या होती हे दाखवण्यासाठी मदत मागत आहेत” असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी पत्रात म्हटलं आहे.

  • 6/11

    सुब्रहमण्यम स्वामी यांनी यावेळी नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणी थेट किंवा राज्यपालांच्या मार्फत सीबीआय चौकशी करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी केली आहे.

  • 7/11

    मुंबई पोलीस सध्या करोनाच्या जबाबदारीमुळे व्यस्त असल्याने हा तपास सीबीआयकडे द्यावा असं ते म्हणाले आहेत.

  • 8/11

    सल्ला दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीबीआय चौकशीची मागणी मान्य करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

  • 9/11

    एकदा आजतक वृत्तवाहिनी बोलताना चित्रपट समीक्षक सुभाष के झा म्हणाले होते की,"रियासोबतच्या दोन वर्षांच्या रिलेशनमध्ये सुशांत खूप बदलला होता. रियासोबतच्या रिलेशनमध्ये गेल्यानंतर सुशांत काहीसा एकटा पडला होता. मूळात तो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचा."

  • 10/11

    सुब्रहमण्यम स्वामी यांच्या व्यतिरिक्त शेखर सुमन, भाजपा खासदार रुपाली गांगुलीदेखील सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

  • 11/11

    शेखर सुमन यांनी आत्महत्येमागे बॉलिवूडमधील गँग असू शकते अशी शक्यता वर्तवलेली आहे. तर रुपा गांगुली यांनी सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटशी छेडछाड होत असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Bjp subramanian swamys letter to pm modi in sushant singh rajputs demise sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.