झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावरदेखील प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. अण्णा नाईकांशी लग्न करून शेवंता नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. इकडे माईने घरात हळदी कुंकवाचा घाट घातलाय, इतक्यात हातात हिरवाचुडा, कपाळावर मोठ्ठं कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो. शेवंताने तिचा पण पूर्ण केला आणि अण्णांशी लग्न केलं. पण आता शेवंताला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल की यामागेसुद्धा अण्णांचा काही कारस्थान आहे हे येत्या भागात कळेल. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर शेवंताची भूमिका साकारत असून माधव अभ्यंकर हे अण्णांची भूमिका साकारत आहे. मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. -
गूढ आणि थरारपूर्ण कथानक असलेल्या या मालिकेची प्रेक्षकांमध्ये आता आणखी उत्सुकता वाढली आहे.
रात्रीस खेळ चाले २ : अण्णांशी लग्न करून शेवंता करणार नाईक वाड्यात प्रवेश
Web Title: Ratris khel chale serial updates shevanta to marry anna naik ssv