-
अभिनेत्री जुही बब्बर हीचा काल वाढदिवस झाला. २० जुलै १९७९ रोजी तिचा जन्म झाला. प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर यांची ती मुलगी. 'काश आप हमारे होते' या चित्रपटातून जुहीने सोनू निगमसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (सर्व फोटो सौजन्य – जुही बब्बर इन्स्टाग्राम)
-
जुहीचे वडील राज बब्बर यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत दुसरे लग्न केले. पहिला विवाह त्यांचा नादिरा बब्बर यांच्या बरोबर झाला होता. आर्य आणि जुही ही पहिल्या पत्नीपासून झालेली दोन मुले तर स्मिता पाटील यांनी प्रतिक बब्बरला जन्म दिला.
-
जुही बब्बरला बॉलिवूडमध्ये फार यश मिळाले नाही. तिने नंतर जिम्मी शेरगीलसोबत 'यारा नाल बाहरन' या पंजाबी चित्रपटात काम केले. हा चित्रपटाने चांगला व्यवसाय केला.
-
आपली आई नादिरा बब्बर यांच्याप्रमाणे जुही थिएटरमध्ये जास्त रमली. चित्रपटांमध्ये ती फार झळकली नसली तरी तिने अनेक नाटकांमध्ये कामे केली.
-
जुही बब्बरचा सुद्धा हा दुसरा विवाह आहे. फार कमी जणांना माहित असेल क्राइम पेट्रोल फेम अनुप सोनी बरोबर लग्न करण्याआधी जुहीचा चित्रपट दिग्दर्शक बिजॉय नाम्बियार सोबत लग्न झाले होते. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
बिजॉय नाम्बियारने शैतान, वझीर सारख्या चिपत्रटाचे दिग्दर्शन केले आहे. जुहीने बिजॉय नाम्बियार बरोबर २००७ साली लग्न केले. पण दोन वर्षातच २००९ साली त्यांचा घटस्फोट झाला. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.
-
"मला जे काम करायचे होते, तसे काम मिळत नव्हते म्हणून मी अनेक वर्ष चित्रपटांपासून दूर राहिले. माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत होत्या आणि अखेर अनुप सोनी माझ्या आयुष्यात आला. ही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे" असे जुहीने मिड डे शी बोलताना सांगितले.
-
अनुप आणि जुहीला एक मुलगा असून ती आता आईच्या भूमिकेत आहे.
-
तिने जवळपास १५ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केले व मनोज बाजपेयीसोबत अय्यारी (२०१८) चित्रपटात छोटी पण प्रभावी भूमिका केली. जुही या चित्रपटात मनोज बाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत होती.
-
प्रतिक सावत्र भाऊ असला तरी त्यांच्यामध्ये सख्ख्या भावंडांसारखे आपुलकीचे नाते आहे. "मी खरोखरच भाग्यवान आहे. मला नादिरा बब्बरसारखी आई मिळाली. तिने मला आर्य आणि प्रतिक दोघांकडे एकाच नजरेने बघायला शिकवले" असे जुही बब्बरने सांगितले.
क्राइम पेट्रोल फेम अनुप सोनीची पत्नी जुही बब्बरबद्दल जाणून घ्या खास गोष्टी
Web Title: Know about raj babbar daughter crime petrol fame anup sonis wife actress juhi babbar dmp