अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 'दिल बेचारा' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिल बेचारा हा सुशांतचा अखेरचा चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय. या चित्रपटाविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात आणि सोबतच चित्रपटातील काही फोटोदेखील पाहुयात. ( सौजन्य : सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस) सुशांतची मुख्य भूमिका असलेला दिल बेचारा हा चित्रपट आज (२४ जुलै) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुशांतसह अभिनेत्री संजना सांघी ही स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या संजनाने सुशांतसोबतचे आणि चित्रपटातील अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दिल बेचाराचं दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केलं आहे. तर या चित्रपटात संजना आणि सुशांतव्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खानदेखील कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. दिल बेचारामध्ये सुशांत मॅनी तर संजना किझी ही भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरने अनेक विक्रम मोडीत काढले असून पहिल्याच दिवशी हा ट्रेलर सर्वाधिक पाहिला गेला. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. अलिकडेच या चित्रपटातील दिल बेचारा टायटल ट्रॅक ,तारे गिन ,‘खुलके जीने का’ ही गाणी प्रदर्शित झाली.
‘दिल बेचारा’च्या सेटवरील सुशांतचा जिंदादिल अंदाज
Web Title: Photo gallery dil bechara to be released today watch pics of the films shoot ssj