• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. iron man fitness freak and hot model milind soman breath taking pictures ssv

वयाच्या पन्नाशीनंतरही तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा मिलिंद सोमण

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
    • 'आयर्न मॅन', 'फिटनेस फ्रीक' अशा विविध नावांनी अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण ओळखला जातो.
    • मिलिंदचं व्यायामासाठी, फिटनेससाठी असलेलं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे.
    • सोशल मीडियावर विविध फोटो व व्हिडीओ पोस्ट करत तो व्यायाम व फिटनेसचं महत्त्व समजावून सांगत असतो.
    • मिलिंदने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली.
    • १९८८ मध्ये मिलिंदला मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली होती.
    • मॉडेलिंग करत असतानाही मिलिंद त्याच्या फोटोशूटमुळे फार चर्चेत असायचा.
    • मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेकदा मिलिंदला वादविवादालाही सामोरं जावं लागलं होतं.
    • १९९१ साली त्याचं गर्लफ्रेंडसोबतचं न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलंच गाजलं होतं.
    • १९८९ मध्ये त्याला एका जाहिरातीची पहिली ऑफर मिळाली होती.
    • या जाहिरातीच्या फोटोशूटसाठी त्याला तब्बल ५० हजार रुपये मानधन मिळालं होतं.
    • त्यावेळी मिलिंद २३ वर्षांचा होता. एका हॉटेलमध्ये तो काम करत होता. वेटर किंवा कूक होण्याचीही त्याची इच्छा होती.
    • मिलिंदने जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत बाजी मारली होती.
    • विशेष म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी मिलिंद सोमणने शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करून दाखविली होती.
    • मिलिंदला ट्रेकिंगचीही फार आवड आहे.
    • २००६ मध्ये मिलिंदने ‘वॅली ऑफ फ्लॉवर्स’ या सिनेमातील त्याची सह-कलाकार मॅलेन जाम्पनोईशी विवाह केला होता. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी २००९ मध्ये घटस्फोट घेतला.
    • यानंतर तो काही काळ सहाना गोस्वामी या अभिनेत्रीलाही डेट करत होता. या दोघांमधील वयातील अंतर २१ वर्षे होते. या नात्यातही मिलिंद चार वर्षे होता.
    • त्यानंतर मिलिंदने अंकिता कोनवारशी लग्नगाठ बांधली. मिलिंद आणि अंकिता यांच्यामध्येही वयाचं बरंच अंतर आहे.
    • वयाची पन्नाशी ओलांडलेला मिलिंद आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
    • त्याचं फिटनेसविषयीचं प्रेमच तरुणींना त्याच्याकडे अधिकाधिक आकर्षित करतं.
    • 1/20

      सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, मिलिंद सोमण

Web Title: Iron man fitness freak and hot model milind soman breath taking pictures ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.