• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. i was selected to the armed services mahi gill mppg

लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • बॉलिवूड ही भारतातील सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या लोकप्रिय इंडस्ट्रींपैकी एक आहे. या क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न आज देशातील लाखो तरुण बाळगताना दिसतात. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी काही मंडळी आपल्या नोकऱ्या किंवा उद्योगधंदे देखील सोडून देतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी चक्क भारतीय आर्मीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
    1/16

    बॉलिवूड ही भारतातील सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या लोकप्रिय इंडस्ट्रींपैकी एक आहे. या क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न आज देशातील लाखो तरुण बाळगताना दिसतात. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी काही मंडळी आपल्या नोकऱ्या किंवा उद्योगधंदे देखील सोडून देतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. जिने बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी चक्क भारतीय आर्मीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 2/16

    या अभिनेत्रीचं नाव आहे माही गिल. माही आज बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु कधीकाळी ती आर्मीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 3/16

    माहीचा जन्म चंदिगढमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिचे वडील शासकीय अधिकारी आणि आई महाविद्यालयात प्रवक्ता म्हणुन काम करत होती. जेव्हा माही शाळेत शिकत होती तेव्हा तिने एनसीसीमध्ये भाग घेतला होता, ज्यामुळे तिचा सैन्यात प्रवेश करण्याचा मार्ग सोपा झाला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 4/16

    भारतीय आर्मीच्या विविध परिक्षांमध्ये चांगले मार्क मिळवल्यामुळे तिची सैन्यात निवड झाली. परंतु आर्मीच्या प्रशिक्षणासाठी जेव्हा ती चेन्नईला गेली होती तेव्हा तिचा अपघात झाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 5/16

    डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत माहीने हा किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 6/16

    चेन्नईच्या विमानतळावर पॅरासीलिंगच्या प्रशिक्षणादरम्यान तिचा अपघात झाला. या अपघातात तिला फारशी दुखापत झाली नाही. परंतु घटनेमुळे तिचे कुटुंबिय घाबरले अन् तिला घरी बोलवून घेतले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 7/16

    कुटुंबियांच्या आग्रहास्तव तिने पुढील प्रशिक्षण घेतले नाही. परिणामी आर्मीमध्ये मिळू शकणारी नोकरी तिला नाकारण्यात आली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 8/16

    आर्मीव्यतिरिक्त माहीला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मग तिने आभिनयाचे योग्य प्रशिक्षण घेऊन बॉलिवूडमध्ये आपलं नशिब आजमावलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 9/16

    आज माही गिल बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 10/16

    २००३ साली 'हवाई' या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 11/16

    त्यानंतर 'खुशी मिल गई', 'सिर्फ पांच दिन', 'चक दे फट्टे', 'गुलाल' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 12/16

    माहीला खरी लोकप्रियता मिळाली ती अनुराग कश्यपच्या 'देवडी' या चित्रपटामुळे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 13/16

    'देवडी' चित्रपटाला तिकिटबारीवर फारसं यश मिळालं नाही. मात्र तिच्या अभिनयाची समिक्षकांमार्फत प्रचंड स्तुती केली गेली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 14/16

    त्यानंतर 'दबंग', 'पान सिंग तोमर', 'साहेब बिबि और गँगस्टर', 'गँग्स ऑफ घोस्ट' यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 15/16

    माहीची 'अपहरण' ही वेब सीरिजदेखील तुफान गाजली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

  • 16/16

    माहीची 'अपहरण' ही वेब सीरिजदेखील तुफान गाजली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Web Title: I was selected to the armed services mahi gill mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.