-
वय हा केवळ एक आकडा आहे असे आपण बऱ्याच वेळा ऐकतो आणि बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हे सिद्ध देखील करुन दाखवले आहे. वयाची ४० ओलांडल्यानंतरही अनेक अभिनेत्यांनी वडील होण्याचा आनंद घेतला आहे. चला जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांविषयी जे वायची ४० ओलांडल्यानंतर बाबा झाले आहेत…
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने एकीकडे त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला तर दुसरीकडे त्याने तो चौथ्यांदा बाबा होणार असल्याचे सांगितले आहे.
-
२०११मध्ये आमिर खान तिसऱ्यांदा वडिल झाला. त्यावेळी तो ४६ वर्षांचा होता.
-
वयाच्या ४६व्या वर्षी अभिनेता अर्जुन राम पाल बाबा झाला आहे. अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आहे. अर्जुन तिसऱ्यांदा बाबा झाला आहे.
-
वयाच्या ५२व्या वर्षी अभिनेते राजेश खट्टर पुन्हा बाबा झाले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तीन मुले आहे. पहिली पत्नी रिया शर्मा आणि संजय दत्तला एक मुलगी आहे. तिचे नाव त्रिशला आहे. २०१०मध्ये संजय दत्ता आणि मान्यता दत्तला जुळ्याची मुले झाले. तेव्हा संजय ५१ वर्षांचा होता.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख वयाच्या ४७व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा झाला. शाहरुख आणि गौरी खानने सरोगसीद्वारा अबराहमला जन्म दिला आहे.
-
लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांची पहिली पत्नी ललिता कुमारी. त्यांना तीन मुली आहेत. त्यानंतर २०१०मध्ये प्रकाश राज यांनी कोरियोग्राफर पोनी वर्मा यांच्याशी लग्न केले. जवळपास वयाच्या ५०व्या वर्षी ते पुन्हा बाबा झाल्याचे म्हटले जाते.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर बाबा झालेले बॉलिवूड अभिनेते
जाणून घ्या अभिनेत्यांविषयी..
Web Title: Bollywoood actors who become father after crossing 40 avb