
सध्याच्या काळात चित्रपट, मालिका किंवा नाटक यांच्यापेक्षा वेब सीरिज पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल अधिक असल्याचं दिसून येतं. त्यातच या वेब सीरिजसाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळी आपण सहजरित्या या सीरिज पाहू शकतो. विशेष म्हणजे या ओटीटीवर सगळ्या प्रकारचा कंटेन्ट असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच अनेकांचा कल हा हॉरर वेब सीरिज पाहण्याकडे असतो. त्यामुळे ओटीटीवर सहज पाहता येतील अशा हॉरर सीरिज कोणत्या ते जाणून घेऊयात.( सौजन्य : सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस/ सोशल मीडिया) सुजय घोष दिग्दर्शित टाइपरायटर ही सीरिज जुलै २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजमध्ये चार लहान मुलं आणि त्यांनी घेतलेला भूताचा अनुभव दाखवण्यात आला आहे. या सीरिजची मूळकथा एका टाइपरायटरभोवती फिरताना दिसते. या सीरिजमध्ये चार लहान मुलांना घोस्ट ऑफ सुल्तानपूर हे पुस्तक मिळतं आणि त्यातून त्यांना एका टाइपराटरमध्ये असलेल्या भूताविषयी माहिती मिळते. मात्र हे चारही लहान मुलं या भूताला पळववण्यात यशस्वी ठरतात. अशी एकंदरीत या सीरिजची कथा आहे. वेब विश्वातील सर्वात गाजलेली दुसरी सीरिज म्हणजे गहराइया. या सीरिजची निर्मिती विक्रम भट्ट यांनी केली असून दिग्दर्शन सिद्धांत सचदेव यांनी केलं आहे. तसंच या सीरिजमध्ये अभिनेता संजय शेख आणि वत्सल शेठ हे मुख्य भूमिकेत झळकले आहे. तसंच अभिनेत्री संजीदा शेखदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतं. या सीरिजच्या कथेमध्ये रैना मलिक(संजिदा शेख) ही २६ वर्षीय तरुणी तिचं प्रोफेशन सोडून मुंबईमध्ये शिफ्ट होते. मात्र मुंबईत ती राहत असलेल्या घरात तिला चित्रविचित्र गोष्टींचे भास होतात. सतत कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचं जाणवतं. त्यानंतर ती या घटनेचा शोध घेते. मात्र तिच्या या संपूर्ण प्रवासात अनेक चढउतार आणि भयंकर अनुभव तिला आल्याचं दिसून येतं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलीन या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकली आहे. ही सीरिज सायकोलॉजिकल थ्रिलर असून त्यात प्रचंड सस्पेन्स, हॉरर अशा गोष्टींचा भरणा करण्यात आला आहे. या सीरिजची कथा अलीशा खन्ना या लेखिकेभोवती फिरताना दिसते. अलीशा एक प्रसिद्ध लेखिका असल्याचं दाखविण्यात आलं असून एका कार दुर्घटनेत तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. या सीरिजमध्ये कल्कीसोबत अभिनेता संजय सूरी आणि भूमिका चावला महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. घुल हा एक अरेबिक शब्द असून त्याचा खरा अर्थ जिन्न किंवा पिशाच्च असा होता. या सीरिजमध्ये देशप्रेमाने भारावून गेलेली एक मुलगी तिच्या वडिलांच्या देशद्रोही कारवायांविषयीची माहिती पोलिसांना देते. मात्र मुलीमुळे आपला हेतू साध्य न झालेला पिता घुल नामक एका पिशाच्चाकडे मदत मागतो. नेटफ्लिक्सवर असलेली ही सीरिज घूल या पिशाच्च्याभोवती फिरताना दिसते. रहस्यमय, भयावह कथांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक रस्किन बॉण्ड यांच्या कथेवर ही सीरिज आधारलेली आहे. या सीरिजच्या प्रत्येक भागातून नवनवीन खुलासे होताना दिसतात. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार झळकले असून ही झी५ ची ओरिजनल सीरिज आहे.
अंगावर काटा आणणाऱ्या ५ हॉरर वेब सीरिज!
हॉरर वेब सीरिज आवडणाऱ्यांंनी आवर्जुन पाहाव्यात अशा काही सीरिज
Web Title: Top five horror hindi web series on netflix zee5 and other ott platform ssj