टॉलिवूड ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे. दाक्षिणात्य कलाविश्वात नशीब आजमावल्यानंतर पूजाने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.विशेष म्हणजे कमी कालावधीत पूजा लोकप्रिय ठरली आहे. ( सौजन्य : सर्व फोटो पूजा हेगडे फेसबूक पेज) लोकप्रियतेचं शिखर सर करणाऱ्या पूजाचा आज वाढदिवस. १३ ऑक्टोबर १९९० मध्ये मुंबईमध्ये जन्म झालेल्या पूजाला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. शाळेत आणि महाविद्यालयात तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेत तिच्यातील अभिनयाची चुणूक दाखविली होती. 'मूगामूडी' या चित्रपटाच्या माध्यमातून पूजाने कलाविश्वात पदार्पण केलं. 'मूगामूडी' हा तमिळ चित्रपट तिच्या करिअरमधील पहिला चित्रपट आहे. 'मूगामूडी' या चित्रपटानंतर पूजाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आणि दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेचा आणि प्रगतीचा आलेख उंचावत गेला. पूजाने अनेक तामिळ, तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या 'मोहेंजोदारो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खरं तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र, पूजाच्या अभिनयाची अनेकांनी दखल घेतली. 'मोहेंजोदारो'नंतर पूजा 'हाऊसफूल ४' या चित्रपटात झळकली. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात तिने अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. पूजा लवकरच 'राधे श्याम' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून यात प्रभास आणि पूजा रोमॅण्टिक अंदाजात दिसून आले आहेत. -
पूजा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
-
अभिनयासोबतच तिला फोटोशूट करण्याचीही तितकीच आवड आहे. अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर ती झळकली आहे.
-
पूजा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे कायम चर्चेत असते.
-
पूजाला प्राण्यांची विशेष आवड असून ती श्वानप्रेमी असल्याचं दिसून येतं.
सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी पूजा हेगडे
सौंदर्याचा अॅटमबॉम्ब! घायाळ करणाऱ्या पूजा हेगडेच्या अदा
Web Title: South movie actress pooja hegde birthday special ssj