• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrities who died in poverty and loneliness avb

प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा अखेरचा काळ गेला गरीबीत आणि एकटेपणात

जाणून घ्या कलाकारांविषयी…

Updated: September 9, 2021 18:38 IST
Follow Us
  • बऱ्याचवेळा आपण बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान लाइफस्टाइल बद्दल ऐकतो. पण कधीकधी त्यांच्या आयुष्यातही समस्या असतात. आज आपण बॉलिवूडमधील अशाच कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे करिअर प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांचा अखेरचा काळ गरीबी आणि एकटेपणात गेला.
    1/7

    बऱ्याचवेळा आपण बॉलिवूड कलाकारांच्या आलिशान लाइफस्टाइल बद्दल ऐकतो. पण कधीकधी त्यांच्या आयुष्यातही समस्या असतात. आज आपण बॉलिवूडमधील अशाच कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे करिअर प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांचा अखेरचा काळ गरीबी आणि एकटेपणात गेला.

  • 2/7

    या यादीमध्ये बॉलिवूडमधील अतिशय ग्लॅमर अभिनेत्री परवीन बॉबीचा समावेश आहे. तिने ‘दीवार’, ‘सुहाग’, ‘नमक हलाल’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांचे निधन एकटेपणामुळे झाल्याचे म्हटले जाते. २२ जानेवारी २००५ साली मुंबईमधील राहत्या घरात त्यांचे निधन झाले.

  • अचला सचदेव यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास १२० चित्रपटांमध्ये काम केले असल्याचे म्हटले जाते. ३० एप्रिल २०१२मध्ये प्रदीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. निधनापूर्वी त्या एकट्या राहू लागल्या होत्या.
  • 3/7

    चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी. त्यांचा उल्लेख मलिका-ए-जज्बात म्हणजे भावनांची सम्राज्ञी असा व्हायचा. त्यांचा मृत्यू ३१ मार्च १९७२ रोजी झाला. ज्यावेळी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यांच्याकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी देखील पैसे नव्हते.

  • 4/7

    ए के हंगल यांनी जवळपास २२५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. त्यांना बऱ्याच वेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. २६ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचे निधन झाले.

  • 5/7

    भगवान दादा बॉलिवूडमध्ये एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जायचे. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्यांनी त्यांचे मोठे घर विकून एका चाळीमध्ये राहण्यासाठी खोली घेतली होती. २००२ साली त्यांनी जगाचा निरोप घेतला.

  • 6/7

    बॉलिवूड अभिनेत्री विमी यांनी 'हमराज', 'पतंग' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना दारुचे व्यसन लागले होते. २२ ऑगस्ट १९७७ रोजी मुंबईमधील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पैसे नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.

Web Title: Bollywood celebrities who died in poverty and loneliness avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.