-
अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रियकर विकी जैनबद्दल एक पोस्ट लिहून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. विकी आपली सपोर्ट् सिस्टिम असल्याचं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (सर्व फोटो सौजन्य – अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम)
-
तुझ्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयत. "मी आपल्या दोघांना एकत्र पाहते, तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो. मित्र, जोडीदार म्हणून तुला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल मी नेहमी देवाची आभारी राहीन"
-
आपल्यामुळे टीका सहन करावी लागली, याबद्दल तिने प्रियकराची माफी सुद्धा मागितली आहे.
-
"माझ्यासाठी तू नेहमी उभा आहेस, याबद्दल मनापासून आभारी आहे. माझ्या सगळया समस्या तू तुझ्या केल्या आणि गरज असताना मला मदत केल्याबद्दल थँक्यू. तू माझी सपोर्ट सिस्टिम आहेस, माझी परिस्थिती आणि मला समजून घेतल्याबद्दल मी विशेष करुन तुझी आभारी आहे" असे अंकिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
खर तू टीकेला पात्र नव्हतास, पण माझ्यामुळे तुझ्यावर टीका झाली याबद्दल मी माफी मागते असे अंकिताने पोस्टमध्ये लिहिले आहे.
-
"शब्द अपुरे पडतील. पण ही बाँडिंग अदभूत आहे. मी तुझ्यावर प्रेम करते" असे अंकिताने म्हटले आहे.
-
अंकिता लोखंड आणि सुशांत सिंह राजपूतमध्ये सहावर्ष प्रेमसंबंध होते. २०१६ साली त्यांचे नाते संपुष्टात आले.
-
सुशांतचा जून महिन्यात मृत्यू झाला. त्यानंतर अनेकांनी टि्वटरवरुन विकीला टार्गेट केले. कारण त्याचे अंकितासोबत प्रेमसंबंध आहेत.
-
सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने सुशांतच्या कुटुंबीयांना साथ दिली पण तिने विकीसोबतचे नातेही संभाळले. सोशल मीडियावर पोस्ट करुन ती विकीबद्दलचे आपले प्रेमही व्यक्त करत असते.
-
काही आवडयांपूर्वी तिने तिच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींबद्दल पोस्ट लिहीली होती. ही पोस्ट तिने कुटुंबीय आणि विकीला टॅग केली होती.
अंकिताने प्रियकर विकी जैनची माफी मागितली कारण…
Web Title: Ankita lokhande said sorry to beau vicky jain in heartfelt note dmp