सगळ्यांच्या मनात हक्काची जागा मिळवणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (सौजन्य : श्याम पाठक इंस्टाग्राम) दयाबेन, जेठालाल, भिडे यांच्यासोबतच चाहत्यांमध्ये कायम चर्चा रंगते ती पोपटलालची. एका हातात छत्री आणि' दुनिया हिला दुँगा' हा संवाद यामुळे पोपटलाल म्हणजेच श्याम पाठक लोकप्रिय झाले आहेत. लग्नासाठी उत्सुक असलेल्या पोपटलाल याला काही केल्या लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. त्यामुळे गोकूळधाममधील प्रत्येक जण त्याचं लग्न जुळवण्यासाठी खटपट करत असल्याचं दिसून येतं. तूफान एक्स्प्रेसमध्ये काम करणाऱ्या पत्रकार पोपटलाल पांडेची भूमिका श्याम पाठक यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे मालिकेत पोपटलाल यांचं लग्न झालेलं नसलं तरीही प्रत्यक्षात त्यांचं लग्न झालेलं आहे. श्याम पाठक यांचं लग्न झालं असून रश्मी पाठक असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. विशेष म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज असल्याचं सांगण्यात येतं. श्याम आणि रश्मी यांना २००३ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. त्यांना तीन मुलं असून बऱ्याच वेळा ते सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. श्याम पाठक यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. -
(सौजन्य : श्याम पाठक इंस्टाग्राम)
-
(सौजन्य : श्याम पाठक इंस्टाग्राम)
काय सांगता! पोपटलालचं लग्न झालंय ? पाहा, श्याम पाठकच्या फॅमिलीचे फोटो
Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah cast patrakar popatlal shyam pathak personal life marriage ssj