-
अभिनेत्री पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता त्यांना जामीन मिळाला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर झाला आहे. परंतु जाणून घेण्याची बाब म्हणजे हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? गोवा पोलिसांनी पूनम पांडेला का केली होती अटक? (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पूनम पांडे हनीमून साजरा करण्यासाठी गोवा येथे गेली होती. त्यावेळी तिने चापोली धरणावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे हे धरण पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिडीओबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं संताप व्यक्त केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? भाजपा गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करु पाहतेय का? असे सवाल करत त्यांनी पूनमवर जोरदार टीका केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या तक्रारीनंतर पूनम पांडे व तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे हा व्हिडीओ शूट केला जात असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
शिवाय अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"आधीच गोव्याला पार्टी डेस्टिनेशन व ड्रग्ज डेस्टिनेशन म्हटलं जातं. आता या राज्याची ओळख पॉर्न डेस्टिनेशन करायची आहे का?" अशा शब्दात त्यांनी या प्रकरणी भाजपा सरकारवर देखील टीका केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
पूनम पांडेला पोलिसांनी का केली होती अटक?
Web Title: Why poonam pandey arrested in goa mppg