• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kamal haasan birthday special to know about his personal life ssj

… म्हणून अभिनयासोबत अफेअर्समुळेही चर्चेत होते कमल हासन

कमल हासन यांनी पाच जणींना केलंय डेट?

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
    • कमल हासन हे नाव आता कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेलं नाही. केवळ कलाविश्वच नाही तर राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाचा आता दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. (सौजन्य : कमल हासन इन्स्टाग्राम, इंडियन एक्स्प्रेस)
    • दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले. यातील ‘सदमा','चाची ४२०' हे चित्रपट सुपरहिट ठरले.
    • त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे कमल हासन यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
    • त्यातच एकेकाळी त्यांच्या लव्ह लाइफविषयी अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
    • बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारे कमल हासन केवळ उत्तम अभिनेताच नाही, तर ते एक दिग्दर्शक व प्लेबॅक सिंगरदेखील आहेत.
    • ‘कलाथुर कन्नामा’ हा त्याचा पहिलावहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
    • त्यानंतर ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘चाची 420’, ‘हे राम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.
    • विशेष म्हणजे त्याकाळी या गाजलेल्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असे. यात अनेकदा त्यांची लव्ह लाइफ चर्चेत राहिली.
    • कमल हासन यांचे ७०च्या दशकात अभिनेत्री श्रीविद्यासोबत अफेअर होते.
    • त्यानंतर १९७८ साली कमल हासनने वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र त्यांचा संसार १० वर्षे टिकला.
    • त्यानंतर कमल हासनच्या आयुष्यात सारिकाची एण्ट्री झाली. कमल हासन आणि सारिका लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र सारिका गर्भवती असल्याचे समजताच १९८८ मध्ये त्यांनी विवाह केल्याच्या चर्चा होत्या.
    • त्यांना श्रुती आणि अक्षया या दोन मुली आहेत.
    • कमल हासन यांनी २००४ मध्ये सारिकापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
    • त्यानंतर कमल हासनने २२ वर्षांनी लहान असलेल्या सिमरनला डेट करण्यास सुरुवात केली. मात्र त्याचे हे नातेही फार काळ टिकले नाही.
    • सिमरनने तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न केले.
    • या सर्वानंतर कमल हासनच्या आयुष्यात गौतमीची एण्ट्री झाली. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र १३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहून अखेर २०१६ मध्ये दोघांनी नात्याला पूर्णविराम लावला.

Web Title: Kamal haasan birthday special to know about his personal life ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.