-
अभिनेता सैफ अली खान हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
गेली दोन दशकं बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला सैफने आता आपलं लक्ष वेब सीरिजच्या दिशेने वळवलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सेक्रेट गेम्स या सुपरहिट सीरिजनं सैफच्या करिअला एक वेगळीच दिशा दिला दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परिणामी सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या या अभिनेत्यानं स्वत:च्या मानधनात तब्बत तीन पट वाढ केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार यापूर्वी सैफ प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचं मानधन घेत होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
परंतु सेक्रेड गेम्सच्या यशानंतर सिनेसृष्टीत सैफचा भाव वधारला परिणामी तो आता एका प्रोजेक्टसाठी ११ कोटी रुपयांचं मानधन घेणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
लक्षवेधी बाब म्हणजे या अभिनेत्याने केवळ फीजमध्येच नव्हे तर आपल्या शर्तींमध्येही बदल केला आहे. जर एखादा चित्रपट सिनेमागृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार असेल तर सैफ त्यासाठी अतिरिक्त मानधन घेणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सैफच्या या मानधन वाढीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका नवा सुपरस्टार उदयाला आला आहे अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सैफचे 'लाल कप्तान' आणि 'जवानी जानेमन' हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले होते. मात्र 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या सुपरहिट चित्रपटामुळे तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
येत्या काळात सैफ अली खान 'भूत पोलीस' आणि 'बंटी और बबली २' मध्ये झळकणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
सैफ अली खाननं मानधनात केली तीनपट वाढ; आता घेणार इतके कोटी रुपये
Web Title: Saif ali khan increases his per project fees 3 to 4 times mppg