अभिनेत्री काजल अगरवाल पती गौतम किचलूसह हनिमूनसाठी मालदीवला पोहोचली आहे. हनिमूनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्यग्र वेळापत्रकापासून दूर निळाशार समुद्रातील आलिशान हॉटेलमध्ये काजल आणि गौतम थांबले आहेत. जेव्हा जेव्हा मी या देशाला भेट देते, तेव्हा मी प्रचंड आनंदी आणि मुक्त असल्याची जाणीव मला होते, असं कॅप्शन तिने दिलंय. काजलने पतीसोबतचे काही रोमॅण्टिक फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. हनिमूनला गेलेली काजल तिच्या रुटीनला मात्र विसरली नाही. ३० ऑक्टोबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये काजल आणि गौतमचा विवाहसोहळा पार पडला. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या व कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. -
काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, काजल अगरवाल)
हनिमूनला गेलेल्या काजल अगरवालने पोस्ट केले पतीसोबतचे रोमॅण्टिक फोटो
Web Title: Kajal aggarwal and hubby gautam kitchlu get romantic in these photos from their honeymoon ssv