'बालिका वधू' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अविका गौर. (सौजन्य : अविका गौर/ मिलिंद चंदवानी इन्स्टाग्राम पेज) अविकाने 'बालिका वधू' या मालिकेत आनंदी या बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तेव्हापासून अविका प्रकाशझोतात आली आहे. आज अविकाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अविकादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी अविका सध्या तिच्या रिलेशनशीपमध्ये चर्चेत आली आहे. अविकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. अविकाने तिच्या प्रियकरासोबत एक खास फोटो शेअर करत त्याच्यासाठी पोस्टदेखील लिहिली आहे. अविकाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिचा प्रियकर नेमका कोण आहे हा एकच प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. अविका मिलिंद चंदवानी याला डेट करत आहे. मिलिंद चंदवानी आयटी क्षेत्रात काम करत असून तो रोडीजमध्येही झळकला आहे. मिलिंद आणि अविका यांची पहिली भेट एका एनजीओच्या वर्कशॉपमध्ये झाली होती. अविकाची पोस्ट पाहिल्यानंतर मिलिंदने देखील त्याच अंदाजात तिला उत्तर दिलं आहे. सध्या मिलिंद आणि अविका यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अविकाने आतापर्यंत मिलिंदसोबत अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अविका सध्या २२ वर्षांची असून गेल्या काही वर्षांमध्ये तिच्यामध्ये अनेक बदल झाल्याचं दिसून येत आहे. 'बालिका वधू'प्रमाणेच तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
‘बालिका वधूफेम अविका गौर डेट करत असलेला मिलिंद चंदवानी आहे तरी कोण?
Web Title: Avika is dating roadies fame milind chandwani ssj