'आई माझी काळुबाई' या सोनी मराठीवरल्या मालिकेचं चित्रीकरण सातारा इथल्या हिंगणगाव गावात होत आहे. सातारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. इथं चित्रीकरण करणं, ही कलाकारांसाठी पर्वणीच आहे. गुलाबी थंडी, दूरवर पसरलेलं निर्सगरम्य आणि प्रसन्न वातावरण, यात काम करण्याचा अनुभव कलाकारांसाठी उल्हास देणारा आहे. मालिकेच्या सेटवरही आई काळुबाईची पूजा केली जाते. काही एकरांच्या जागेवर मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारला आहे. मालिकेत दिसणारा वाडाही याच जागेवर आहे. -
मालिकेत आर्याची भूमिका अभिनेत्री वीणा जगताप साकारत आहे.
-
'आई माझी काळुबाई' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
या निसर्गरम्य ठिकाणी होतंय ‘आई माझी काळुबाई’ मालिकेचं शूटिंग
Web Title: Aai majhi kalubai marathi serial satara set beautiful location ssv