
अभिनेता, दिग्दर्शक व अफलातून डान्सर प्रभूदेवा दुसऱ्यांना लग्न करणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत रिलेशनशिपमध्ये असून तिच्याशीच लग्न करण्याचा त्याचा विचार आहे. या लग्नाच्या वृत्ताला अद्याप प्रभूदेवाकडून दुजोरा मिळालेला नाही. २०११ मध्ये प्रभूदेवाने पत्नी रामलताला घटस्फोट दिला. यादरम्यान प्रभूदेवा व दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रभूदेवा आज जगातील सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरपैकी एक मानला जातो. डान्स आणि कोरिओग्राफीसोबतच त्याने अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातही चांगला जम बसवला आहे. प्रभूदेवा सध्या 'राधे' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.
प्रभूदेवा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?
Web Title: Prabhu deva to tie the knot again ssv