-
बिग बॉस हा रिअॅलिटी शोचा १४ वा सीझन सुरु होऊन आता सहा आठवडे उलटून गेले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या शोमध्ये अभिनेत्री पवित्रा पुनिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पवित्रा आणि एजाज खान या दोघांमध्ये एक वेगळीच केमिट्री पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान त्यांच्या या बहरणाऱ्या नात्यावर पवित्राचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता पारस छाब्रा याने नाराजी व्यक्त केली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पवित्रापासून सावध राहा ती एकाच वेळी अनेक तरुणांना फसवू शकते. मला देखील तिने असंच फसवलं होतं. असं म्हणत पारसने एजाजला सावध करण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पारसच्या या आरोपांवर आता पवित्रानं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"माझ्याबद्दल कोण काय बोलतं यानं मला काहीच फरक पडत नाही. होय मी एक चंचल मुलगी आहे. पण पासरसोबत मी प्रामाणिक होते. या प्रकरणावर मी लवकरच एक व्हिडीओ तयार करणार आहे." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"तो पर्यंत मी एवढंच सांगते की यश मिळवताना जर कोणी माझ्या आड येत असेल तर त्याला बाजूला सारते. हेच मी पारसला देखील सांगेन उगाच माझ्या आड येऊन नकोस अन्यथा माझ्यासारखी वाईट कोणी नसेल." (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पवित्राने हे प्रत्युत्तर बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत चर्चा करताना दिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
पारस आणि पवित्रा जवळपास तीन वर्ष एकमेंकांना डेट करत होते. यापूर्वी प्रतिक सहजपाल आणि एका हॉटेल व्यवसायिकानं देखील पवित्रावर फसवणूकीचे आरोप केले होते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
‘माझ्या यशाच्या आड येऊ नकोस, अन्यथा…’; एक्स बॉयफ्रेंडला पवित्राचा इशारा
Web Title: Pavitra punia paras chhabra bigg boss 14 mppg