-
आपल्या मादक अदांमुळे सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या बिहारमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुज्जफरापूरमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या कुंदर कुमार नामक एका विद्यार्थानं स्वत:च्या आई-वडिलांचं नाव सनी लिओनी आणि इमरान हाशमी असं लिहिलं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्याच्या ओळखपत्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा फोटो पाहून स्वत: सनी लिओनी देखील चक्रावली. दरम्यान तिनं एका ट्विटच्या माध्यमातून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
हा मुलगा खरंच महत्वाकांशी दिसतोय. मित्रा तू नक्कीच प्रगती करशील अशी गंमतीशीर प्रतिक्रिया देऊन सनीने आश्चर्य व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी इमराननं देखील अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती. “शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही” असं तो म्हणाला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मुज्जफरापूरमधील एका कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापिठातील अधिकाऱ्यांनी जेव्हा बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या ओळखपत्राचे फोटो पाहिले तेव्हा तेही चक्रावले. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कुंदर कुमार या धनराज महतो डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्याचे हे आयकार्ड आहे. हे कॉलेज मुज्जफरापूरमधील मिनापूर येथे असून ते भीमराव आंबेडकर विद्यापिठाशी संलग्न आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कुंदरच्या ओळखपत्रावर वडीलांचे नाव इमरान हाशमी असल्याचं लिहिलेलं आहे. तर आईच्या नावाच्या जागी सनी लिओनी असं लिहिलेलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या मुलाच्या पालकांची ही नावं असू शकत नाही असं येथील अधिकाऱ्यांचं मत आहे. जरी असली तरी हा योगायोग असावा असं म्हणता येईल. मात्र एकाच घरातील तीन व्यक्तींची तीन वेगळी अडनावं कशी असू शकतील अशी चर्चाही या आयकार्डवरुन रंगलीय. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
आई म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला सनी लिओनीचं प्रत्युत्तर; म्हणाली, हा मुलगा तर…
Web Title: Sunny leone reacts to bihar student claiming she is her mother mppg