छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे 'तारक मेहता का उलटा चष्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील दयाबेन आणि जेठालाल ही जोडी अनेकांची लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे केवळ देशातच नाही तर विदेशातही ही जोडी लोकप्रिय असल्याचं म्हटलं जातं. मध्यंतरी या मालिकेतून अभिनेत्री दिशा वकानीने काढता पाय घेतला होता. त्यानंतर आता जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशीदेखील ही मालिका सोडणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत धडाकेबाज अभिनय करत दिलीप जोशींनी अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे सध्या त्यांना अनेक ऑफर्स येत असल्याचं दिसून येतं. अलिकडेच दिलीप जोशी यांनी एका युट्यूब वाहिनीवर याविषयीचा खुलासा केला. तारक मेहता या मालिकेने खरं तर दिलीप जोशी यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे या मालिकेसोबत त्यांचं एक खास नातं तयार झालं आहे. मात्र, याच काळात त्यांना अनेक नवीन ऑफर्सदेखील येत आहेत. "सध्या मला अनेक नवनवीन ऑफर्स येत आहेत. मात्र, मी या ऑफर्स नाकारल्या आहेत.कारण तारक मेहता.. या मालिकेमुळे माझं आयुष्य बदललं आहे. माझं संपूर्ण वेळापत्रक खूप व्यस्त असतं. कारण दररोज मी तारक मेहताची शुटींग करतो", असं दिलीप जोशी म्हणाले. "या मालिकेमुळे माझी स्वप्न साकार झाली आहेत. त्यामुळे मी नवीन ऑफस स्वीकारत नाही. या मालिकेमुळे मला लोक दिलीप जोशी ऐवजी जेठालाल म्हणूनच जास्त ओळखतात", असं ही त्यांनी सांगितलं. दिलीप जोशी यांनी केवळ मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सलमान खान, अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे.
‘तारक मेहता..’मधून जेठालालची गच्छंती?
Web Title: New offers to dilip joshi tarak mehta ka ulta chashma ssj