भोजपुरी अभिनेता ते भाजपा खासदार असा प्रवास करणारे रवी किशन हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेलं नाही. भोजपुरी चित्रपटांमधून करिअरची सुरुवात करणारे रवी किशन हे आज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. ( सौजन्य : सर्व फोटो जनसत्ता) लहानपणी जौनपूर येथे राहत असलेले रवी किशन घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि सुपरस्टार व्हायचं स्वप्न उराशी बाळगून घरातून पळून मुंबईला आले. विशेष म्हणजे जौनपूर ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी ते केवळ ५०० रुपये घेऊन आले होते. जौनपूर सोडल्यानंतर रवी किशन यांनी कलाविश्वात नशीब आजमावण्यास सुरुवात केली आणि हळूहळू या क्षेत्रात त्यांचा जम बसू लागला. आता गेल्या कित्येक वर्षांपासून रवी किशन त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईमध्येच पूर्णपणे स्थिरस्थावर झाले आहेत. मुंबईतील गोरेगांव गार्डन इस्टेट अपार्टमेंटमध्ये रवी किशन राहतात. गार्डन इस्टेट अपार्टमेंटमध्ये १४ व्या मजल्यावर रवी किशन यांचं आलिशान घर असून एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे हे घर सजवण्यात आलं आहे. दोन ड्युप्लेक्स एकत्र करुन रवी किशन यांचं हे भव्य घर तयार करण्यात आलं असून ते जवळपास ८ हजार चौरस फूट असल्याचं सांगण्यात येतं. एकेकाळी रवी किशन मुंबईतील एका चाळीमध्ये एकाच घरात १२ जणांसोबत राहत होते. परंतु, आता त्यांच्या या आलिशान घरामध्ये तब्बल १२ बेडरुम्स आहेत. या घरात जीम आणि अन्य सुखसुविधांचीदेखील सोय करण्यात आली आहे. घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती याप्रमाणेत रवी किशन यांचं घर कुटुंबीयांनी भरलेलं असून अत्यंत सुंदररित्या हे घर सजवण्यात आलं आहे. रवी किशन यांनी घरात एक लहानसं गार्डन तयार केलं आहे. यात अनेक फुलझाडांचा समावेश आहे. रवी किशन यांच्याकडे २० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं सांगण्यात येतं. रवी किशन यांच्याकडे इनोव्हा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंज, टोयोटो फॉर्च्युनर, ऑडी ए ६, हार्ले डेव्हिडसन,फॉक्सवॅगन पोलो, यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. रवी किशन लोकप्रिय कलाकार असून त्यांना भोजपुरीमधील अमिताभ बच्चन म्हटलं जातं. रवी किशन एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं.
५०० रूपये घेऊन मुंबईत आलेल्या मेगास्टार रवी किशनकडे आज आहे ८ हजार स्क्वेअर फुटांचं भव्य घर
Web Title: Ravi kishan networth income property inside photos luxurious house bjp mp bhojpuri superstar ssj