• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. reliance owner mukesh ambani daughter isha ambani know all about why bollywood superstars serve food in anand piramals nita ambani daughter wedding dmp

…म्हणून इशा अंबानीच्या शाही लग्नात अमिताभ बच्चन, आमिर खान बनले होते वाढपी

Updated: September 9, 2021 00:41 IST
Follow Us
  • प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकलुती एक मुलगी इशा अंबानीचा १२ डिसेंबर २०१८ रोजी पिरामल इंडस्ट्रीजच्या आनंद पिरामल यांच्याबरोबर विवाह झाला.
    1/15

    प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकलुती एक मुलगी इशा अंबानीचा १२ डिसेंबर २०१८ रोजी पिरामल इंडस्ट्रीजच्या आनंद पिरामल यांच्याबरोबर विवाह झाला.

  • 2/15

    याच महिन्यात या विवाहाला दोन वर्ष पूर्ण झाली. मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कुठलीही कमतरता ठेवली नाही. अत्यंत शाही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.

  • 3/15

    देश-विदेशातील अनेक नामवंत व्यक्ती या लग्नाला उपस्थित होत्या. बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेतील अनेक स्टार्स या लग्नाला उपस्थित होते.

  • 4/15

    एका परिकथेप्रमाणेच या लग्नातील प्रत्येक गोष्ट जुळून आली होती. अगदी इशाच्या लग्नापासून ते रिसेप्शन पार्टीपर्यंत सारं काही डोळे दिपवून टाकणारं होतं.

  • 5/15

    बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांची सर्वाधिक चर्चा रंगल्याचं पाहाला मिळालं.

  • 6/15

    चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या दोन्ही दिग्गज कलाकारांनी इशाच्या लग्नात चक्क जेवणाच्या पंगतीमध्ये वाढप्याची भूमिका पार पाडली.

  • 7/15

    त्यांचा हा व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल झाला होता. पंगत वाढतांनाचे या सेलिब्रिटींचे व्हिडिओ पाहुन अनेकांनी त्यांना ट्रोलही केले.

  • 8/15

    मात्र अभिषेक ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना या मागचं कारण सांगितलं असून हा लग्नातील एक विधी असल्याचं म्हटलं आहे.

  • 9/15

    गुजराती समाजातील लग्नामध्ये हा एक पारंपारिक विधी असतो. यामध्ये वधुपक्षातील लोक वरपक्षातील पाहुण्यांना स्वत: जेवण वाढतात. या विधीला ‘सज्जन घोट’ असं म्हणतात.

  • 10/15

    आम्ही इशाकडून होतो. इशाला आम्ही आमच्या कुटुंबातील मुलगी मानतो आणि त्यामुळेच अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांनी पंगतीमध्ये पाहुण्यांना जेवण वाढलं, असे अभिषेकने सांगितले.

  • 11/15

    दरम्यान, अभिषेकने दिलेल्या या उत्तरामुळे अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले.

  • 12/15

    मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अ‍ॅटीलिया येथे १२ डिसेंबर रोजी इशा अंबानी व आनंद पिरामल यांचा लग्नसोहळा संपन्न झाला.

  • 13/15

    त्याआधी इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची प्री-वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये पार पडली. यावेळी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय अशा सेलिब्रेटींनी यादरम्यान परफॉर्मन्स केला होता.

  • 14/15

    इशाकडे पाहिल्यानंतर साधी राहणी उच्च विचारसरणी याचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो.

  • 15/15

    इशाला मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवायला, पार्टी करण्याची आवड असल्याचं पाहायला मिळतं. शांत स्वभावाची असलेली इशा तिच्या आई-वडिलांचा कायम आदर करत असून त्यांच्या शब्दाबाहेर नाही असं सांगण्यात येतं.

Web Title: Reliance owner mukesh ambani daughter isha ambani know all about why bollywood superstars serve food in anand piramals nita ambani daughter wedding dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.