-
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा समावेश आज भारतातल्या ग्लोबल आयकॉन कलाकारांमध्ये होतो. अन्य कलाकारांप्रमाणे प्रियंकासाठीही हा प्रवास खडतर होता. आजच(दि.१०) प्रियांकाने आपल्या जीवनावर आधारित एक पुस्तक ‘Unfinished’ प्रकाशित केलं. या पुस्तकात प्रियांकाने तिच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केलाय.
-
या पुस्तकातून प्रियांकाने एक खळबळजनक खुलासा केला असून एका दिग्दर्शकाने 'बूब जॉब'चा सल्ला दिला होता, असं सांगितलं आहे.
-
प्रियांकाने कुठेही त्या दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण 'हिंट' मात्र दिली आहे.
-
वर्ष २००० मध्ये 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकल्यानंतर पहिली भेट ज्या दिग्दर्शकासोबत झाली त्यांनी 'बूब जॉब'चा सल्ला दिल्याचं प्रियांकाने म्हटलं आहे.
-
शारीरिक ठेवण योग्य पद्धतीने व्हावी यासाठी तुला 'बूब जॉब'ची गरज असल्याचं त्या दिग्दर्शकाने म्हटलं होतं, असं प्रियांकाने नमूद केलं आहे.
-
इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार, प्रियांकाने आपल्या पुस्तकात लिहिलंय की, काही मिनिटांच्या चर्चेनंतर दिग्दर्शकाने तिला उभं राहायला आणि वळायला सांगितलं.
-
त्याने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर डायरेक्टरने तिच्याकडे बघून तुला 'बूब जॉब'ची गरज आहे, जेणेकरुन तुझी शारीरिक ठेवण योग्य आणि आधीपेक्षा उत्तम होईल, असं म्हटलं.
-
पुस्तकात प्रियांकाने खुलासा केलाय की, डायरेक्टरसोबत झालेल्या त्या काही मिनिटांच्या मिटिंगनंतर ती खूप हैराण झाली आणि स्वतःला कमी लेखायला लागली होती.
-
प्रियांकाने या पुस्तकात असंही म्हटलं आहे की, तिच्या बॉडीमुळे तिला करियरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि सुरू होण्याआधीच सगळं संपतं की काय असं वाटत होतं.
-
सध्या प्रियांकाकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत. ती लवकरच ‘Text For You’ चित्रपटात दिसेल, याशिवाय ती ‘Matrix 4’ सिनेमातही काम करत आहे. (सर्व फोटो- प्रियांका चोप्रा इंस्टाग्राम अकाउंट )
‘त्या’ दिग्दर्शकाने दिला होता Boob Job चा सल्ला, प्रियांका चोप्राचा खळबळजनक खुलासा
‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकल्यानंतर घडली होती घटना
Web Title: Priyanka chopra reveals a director once told her to have a boob job and fix her proportions sas