-
२३ फेब्रुवारी १९६९ रोजी सांगलीच्या पटवर्धन या मराठी कुटुंबात भाग्यश्रीचा जन्म झाला. (फोटो सौजन्य – भाग्यश्री पटवर्धन/इन्स्टाग्राम)
-
भाग्यश्री राजघराण्याशी संबंधित आहे. तिचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन सांगलीचे राजे आहेत.
-
एक-दोन मालिकांमध्ये काम केल्यानंतर भाग्यश्रीला १९८९ साली राजश्री प्रोडक्शनच्या 'मेने प्यार किया' चित्रपटात सलमान खान बरोबर मोठा ब्रेक मिळाला.
-
'मेने प्यार किया' हा करीयरमधील भाग्यश्रीचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. 'मेने प्यार किया'साठी भाग्यश्रीला बेस्ट फिमेल डेब्युचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
-
कैद मे है बुलबुल, त्यागी आणि पायल या तीन चित्रपटात भाग्यश्रीने काम केले.
-
बॉलिवूड शिवाय भाग्यश्रीने तामिळ, तेलगु, कन्नड, मराठी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे.
-
भाग्यश्रीला अभिमन्यू आणि अवंतिका अशी दोन मुले आहेत. भाग्यश्रीच्या मुलाने अभिमन्यूने 'मर्द को दर्द नही होता' या कॉमेडी सिनेमातून डेब्यू केला आहे.
-
भाग्यश्री हे नाव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे ते 'मेने प्यार किया' चित्रपटासाठी. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता.
-
२००१ साली हॅलो गर्ल्समधून भाग्यश्रीने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. जननी, हमको दिवाना कर गये या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.
-
भाग्यश्री आजही फिटनेसला तितकच महत्व देते. एकही दिवस न चुकवता नित्यनियमाने तिचा व्यायाम सुरु असतो. हेच भाग्यश्रीच्या फिटनेसचे रहस्य आहे.
-
पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही सलमान खान चांगला माणूस असल्याचे भाग्यश्रीने सांगितले. त्यासाठी तिने एक उदाहरण दिले.
-
त्यावेळी एक लोकप्रिय फोटोग्राफर होते. आता ते हयात नाहीत. त्यांना माझे आणि सलमानचे काही हॉट फोटो काढायचे होते.
-
त्यांनी सलमानला बाजूला घेऊन सांगितले कि, "मी जेव्हा कॅमेरा सेट करीन, तेव्हा तू तिला किस कर" असे भाग्यश्रीने डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
-
आम्ही त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवोदीत कलाकार होतो. त्यामुळे आपल्याला असे काही करायचे स्वातंत्र्य आहे, असा त्या फोटोग्राफरचा समज होता.
-
त्यावेळी सलमानने त्या फोटोग्राफरचा प्रस्ताव मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तुम्हाला अशी काही पोझ हवी असल्यास, तुम्ही भाग्यश्रीला विचारा, असे त्याने सांगितले.
-
त्या फोटोग्राफरला सलमानने दिलेले उत्तर मला खूप आवडलं. सलमानबद्दलचा आदर आणखी वाढला. मी सुरक्षित लोकांमध्ये वावरत असल्याची मला जाणीव झाली, असे भाग्यश्रीने सांगितले.
…त्यावेळी सलमानने हॉट फोटोंसाठी भाग्यश्रीला किस करायला दिला होता नकार
Web Title: Birthday special maine pyar kiya fame bhagyashree patwardhan unknown information sdn