-
-
बॉलिवूडचे जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी या विविध भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे.
-
आपल्या मतांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊयात..
-
बेंगळुरूच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
-
त्यांना दोन मुली आहेत. १९९४ साली ललिता यांच्याशी लग्न केलं होतं.
-
मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला.
-
घटस्फोटानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान कोरिओग्राफर पोनी वर्माशी लग्नगाठ बांधली.
-
सुरुवातील त्यांच्या मुलींनी लग्नासाठी नकार दिला होता. पण नंतर पोनी यांना भेटल्यानंतर त्यांनी परवानगी दिली.
-
आपल्या दोन्ही मुलींची परवागनी घेऊनच त्यांनी पोनीशी लग्न केलं.
-
एका मुलाखतीत प्रकाश राज यांनी सांगितलं होतं की, “पोनी माझ्या एका चित्रपटासाठी कोरिओग्राफी करत होती. मी माझ्या आई व मुलींना तिच्याविषयी सांगितलं. तिच्याशी लग्न करायची इच्छा त्यांना बोलून दाखवली."
-
पुढे ते म्हणाले, "लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट घालून दिली. मुलींची परवानगी घेतल्यानंतर मी पोनीच्या वडिलांची भेट घेतली आणि तिला लग्नाची मागणी घातली.”
-
‘वॉटेंड’, ‘सिंघम’, ‘दबंग’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये प्रकाश राज यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
१२ वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी प्रकाश राज यांनी केले लग्न, जाणून घ्या लव्हस्टोरी
सुरुवातीला त्यांच्या मुलींनी नकार दिला होता.
Web Title: Prakash raj birthday special love story personal life avb