-
बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी.’
-
या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे मुख्य भूमिकेत आहेत. आजही हा चित्रपट चाहते आवडीने पाहतात.
-
या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
पण या चित्रपटातील देवीप्रसादची नात रिंकू तुम्हाला आठवते का? जिला चित्रपटामध्ये किडनॅप करण्यात आले होते.
-
रिंकू हे पात्र अॅलेक्सिया एनराने साकारले आहे.
-
२१ वर्षांनंतर आता रिंकूला ओळखणेही कठीण झाले आहे.
-
अॅलेक्सिया ही एक पर्यावरणविषयक सल्लागार आहे.
-
तिने वयाच्या तिसऱ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
तिच्या आई-वडिलांना तिने चित्रपटांमध्ये काम करणे पसंत नव्हते.
-
एका मुलाखतीमध्ये अॅलेक्सियाने खुलासा केला होता की, माझ्या कुटुंबीयांना मी चित्रपटांमध्ये काम करणे पसंत नव्हते. कारण चित्रीकरणामध्ये बराच वेळा जातो. पण हेरा फेरी चित्रपटात करण्यास त्यांनी होकार दिला कारण तेव्हा मला शाळेला सुट्ट्या होत्या.
-
या चित्रपटानंतर तिला काम करण्याची संधी मिळाली नाही.
-
अॅलेक्सियाने कमल हासन यांच्यासोबत अववाई षणमुगी या चित्रपटात काम केले आहे.
-
तसेच १९९८मध्ये प्रदर्शित झालेला 'ऐन थाइन मणिकोडी'मध्ये देखील काम केले.
-
अॅलेक्सिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
ती तिचे फोटो सतत शेअर करताना दिसते.
-
आता तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
-
(All Photos :annanra instagram)
‘हेरा फेरी’मधील देवीप्रसादची नात आठवतेय का?; आता तुम्हालाही ओळखता येणार नाही
जाणून घ्या तिच्या विषयी…
Web Title: Hera pheri little girl rinku aka ann alexia anra who played deviprasad granddaughter latest looks avb