-
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहोचला आणि तुफान लोकप्रिय झाला.
-
अभिनेता शशांक केतकरला लहान बहीण असून तिचं नाव दीक्षा असं आहे.
-
दीक्षाने नुकतंच छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
-
'तू सौभाग्यवती हो!' या मालिकेत अभिनेत्री दीक्षा केतकर 'ऐश्वर्या' ही भूमिका साकारत आहे.
-
दीक्षाने बालकलाकार म्हणून काम करत अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केलं.
-
दीक्षाने नाटकांमध्येही काम केले आहे.
-
तिने न्यूयॉर्कला जाऊन अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले आहे.
-
शशांकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित बहिणीच्या पदार्पणाचा आनंद व्यक्त केला होता.
-
शशांक सध्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : शशांक केतकर, दीक्षा केतकर / इन्स्टाग्राम)
शशांक केतकरची बहीणसुद्धा आहे अभिनेत्री; ‘या’ मालिकेत करतेय काम
Web Title: Shashank ketkar sister tu saubhagyavati ho serial fame deeksha ketkar know about her see photos sdn