-
झी टॉकीज ही प्रेक्षकांची लाडकी चित्रपट वाहिनी गेली १३ वर्ष प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सदाबहार चित्रपट, अध्यात्मिक कार्यक्रम, प्रेक्षक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे आवडते कलाकार यांना जवळ आणण्यासाठी खास कार्यक्रम ही वाहिनी प्रेक्षकांसाठी सादर करते. लॉकडाउनच्या काळात देखील झी टॉकीज प्रेक्षकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करत आहे. या महिन्यातील रविवार प्रेक्षकांसाठी अजून खास करण्यासाठी झी टॉकीज ही वाहिनी 'धुवाधार रविवार' हा खास चित्रपट महोत्सव सादर करणार आहे.
-
येत्या रविवारी १६ मे रोजी सकाळी ९ वाजता विनोदाचे बादशाह अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सुपरहिट चित्रपट 'बाळाचे बाप ब्रह्मचारी'.
-
दुपारी १२ वाजता सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या लाडक्या जोडीचा 'नवरा माझा नवसाचा'.
-
दुपारी ३ वाजता महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सदाबहार चित्रपट 'दे दणादण' प्रसारित होईल.
-
संध्याकाळी ६ वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनावर ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून अधिराज्य करणारा 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट प्रसारित होईल.
-
रात्री ९ वाजता मकरंद अनासपुरे याचा 'दे धक्का' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
मनोरंजनाचा रविवार! झी टॉकीजवर पाहता येणार सदाबहार चित्रपट
Web Title: Sunday special old marathi movies on zee talkies sdn