• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samantha akkineni bold scenes in the family man 2 going viral scsg

Photos: ‘फॅमेली मॅन २’ मधील बोल्ड सीन्स चर्चेत; ‘राजी’च्या भूमिकेवर चहाते फिदा

सध्या इंटरनेटवर अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजची तुफान चर्चा असून या सीरिजमधील बोल्ड सीन्सबरोबरच आणि समंथाबद्दलही बऱ्याच पोस्ट केल्या जातायत.

June 9, 2021 19:49 IST
Follow Us
  • family man 2 samantha akkineni
    1/26

    सध्या इंटरनेटवर अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या अभिनयाने नटलेल्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजची तुफान चर्चा आहे. अनेकांना ही वेब प्रचंड आवडली असून पहिल्या भागाप्रमाणेच या भागामध्येही गूढ आणि थरार कायम राखण्यामध्ये निर्मात्यांना आणि कलाकारांना यश मिळाल्याचं कौतुक अनेकांनी केलं आहे. मात्र या सीरिजमधील राजीची भूमिका साकारणाऱ्या समंथाचे सोशल नेटवर्किंगवर तुफान कौतुक केलं जात आहे. अगदी तिने दिलेल्या बोल्ड सीन्सपासून ते हावभावांपर्यंत प्रत्येक गोष्टीत राजीने बाजी मारल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. (सर्व फोटो : अॅमेझॉन प्राइम आणि ट्विटरवरुन साभार)

  • 2/26

    दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख असणाऱ्या समंथा अक्किनेनीने या मालिकेमध्ये प्रोटोगॉनिस्ट म्हणजेच व्हिलनची भूमिका साकारली आहे.

  • 3/26

    प्रभाकरन आणि त्याचे सहकारी हे हल्ल्याचा कट रचत असले तरी मैदानावरील लढाई लढणाऱ्या रजीने अगदी दुसऱ्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत आपलं अस्तित्व पदोपदी अधिक गडत करत गेल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

  • 4/26

    तमिळ लोकांच्या हक्कासाठी आपण प्राण देण्यासही तयार असल्याचं सांगणाऱ्या राजीचं पात्र अनेकांवर छाप पाडून गेलंय.

  • 5/26

    राजी ही वर्तमान परिस्थितीमध्ये सुरवातीला एका छोट्या फॅक्ट्रीमध्ये काम करताना दाखवण्यात आलीय. मात्र अचानक श्रीलंकन सैन्याने उद्धवस्त केलेल्या प्रभाकरनचा दहशतवादी गट पुन्हा सक्रीय होण्याचं ठरवतो आणि पंतप्रधान बासूंवर हल्ल्याची योजना आखली जाते.

  • 6/26

    राजीचं पात्र सीरीजमध्ये छान डेव्हलप करण्यात आलं आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.

  • 7/26

    सुरुवातीला मुकाटपणे सगळं सहन करणारी, आयुष्याला कंटाळलेली आणि मोहीमेमध्ये सहभागी झाल्यानंतर या मोहीमेसाठी प्राण देण्यासही तयार असलेली फुटीरतामतवादी राजी समंथाने उत्तम साकारलीय.

  • 8/26

    राजी ही संघटनेतील सर्वोत्तम फायटर जेट चालवणारी पायलेट असते.

  • 9/26

    समीरच्या साथीने प्रभाकरन एक जुनी विमान ट्रेनिंग कंपनी विकत घेतो आणि राजीच्या याच विमान उडवण्याच्या कौशल्याचा वापर हल्ल्यासाठी करण्याचं ठरवतात.

  • 10/26

    राजी आणि तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्फोटोकांनी भरलेलं विमान भारतीय पंतप्रधान आणि श्रीलंकन पंतप्रधानांची बैठक असणाऱ्या ठिकाणी आदळवून घातपात करण्याची मोहीम या फुटीरतावाद्यांनी आखलेली असते. मात्र ही मोहीम थांबवण्याची जबाबदारी भारत सरकार श्रीकांत आणि त्याचे सहकाऱ्यांच्या खांद्यावर देते.

  • 11/26

    उपजिविकेसाठी एका कंपनीमध्ये काम करणारी साधी भोळी राजी ते थेट पंतप्रधानांना ठार करण्यासाठी स्वत:चे प्राण देण्यास तयार झालेली राजी हे ट्रान्सफॉर्मेशन उत्तम साकारण्यात आलं आहे.

  • 12/26

    सुरवातीच्या काही भागांमध्ये नैराश्य आणि उदासीनता दाखवण्यात आणि नंतर त्याच उदासीनतेची जागा द्वेषाने घेतल्याचं राजीच्या चेहऱ्यावरुन स्पष्टपणे जाणवते.

  • 13/26

    कमीत कमी वाक्य आणि डोळे तसेच हावभावांमधून मांडलेलं म्हणणं ही राजीच्या भूमिकेची उजवी बाजू असल्याचं संपूर्ण सीरीजमध्ये प्राकर्षाने जावणतं राहतं.

  • 14/26

    मोहीमेमध्ये सहभागी होण्याआधी कंपनी सोडताना कंपनीतील मालकाकाडून शरीरसुखाची मागणी केली जाते तेव्हा आपली ओळख पटू नये म्हणून राजी यासाठीही होकार देते.

  • 15/26

    आपल्यावरील अन्यायांच्या आठवणीने राजी अनेकदा भावूक होताना दाखवण्यात आली आहे.

  • 16/26

    मात्र नंतर हाच भावूक स्वभाव द्वेषामध्ये बदलतो. राजी घडलेल्या घटनांसाठी जबाबदार असणाऱ्यांचा काटा काढण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार होते.

  • 17/26

    कथेची गरज म्हणून समंथाने हे बोल्ड सीन्सही अगदी उत्तमपणे साकारलेत.

  • 18/26

    कंपनीचा अधिकारी शरीरसुखाची मागणी करताना अत्याचार करु लागतो आणि त्याचवेळी मात्र जुन्या आठवणींमुळे संतापलेली राजी रागाच्या भरात या अधिकाऱ्याचा खून करते.

  • 19/26

    या बोल्ड सिन्सचीही चाहत्यांनी सोशल नेटवर्किंवर तोंड भरुन कौतुक केलं आहे.

  • 20/26

    अधिकाऱ्याचा खून केल्यानंतर ती त्या मृतदेहाचं काय करते आणि त्यामधून तिची ओळख कशी उघड होते याचं कथानक अगदी उत्तम रेखाटण्यात आलंय

  • 21/26

    सीरीजच्या शेवटच्या काही भागांपैकी एकामध्ये राजी आपल्या मोहीमेसाठी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्याशी शरीरसंबंध ठेवण्यात तयार होते. यामधून या पात्राला आपल्या समाजासोबत झालेला अन्याय हा स्वत:च्या बलिदानापेक्षा फार मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय असच म्हणाव लागेल.

  • 22/26

    एका संघटनेची सैनिक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेलं कौतुक आणि आपण का लढतोय याचं भान राजीला असल्याचं अनेक दृष्यांमधून साकारण्यात आलंय.

  • 23/26

    समंथाने ही भूमिका अगदी उत्तम पद्धतीने साकारली असून इतर कोणी याला न्याय देऊ शकलं नसतं असं तिच्या चाहत्यांचं मत आहे.

  • 24/26

    अगदी मारामारी आणि अॅक्शन सीन्सही समंथाने अगदी उत्तम साकारलेत.

  • 25/26

    समंथाने राजी के पात्र इतक्या उत्तम प्रकारे साकारलं आहे की सीरीज संपली तरी राजी लक्षात राहते, बऱ्याच काळासाठी.

  • 26/26

    अनेकांनी तर कथानकानुसार श्रीकांत जिंकला असला तरी राजीने अभिनयाने मने जिंकल्याचं मत व्यक्त केलंय.

Web Title: Samantha akkineni bold scenes in the family man 2 going viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.