-
सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरुय. अनेक चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा'चाही समावेश आहे. (सर्व फोटो नेटफ्लिक्सवरुन साभार)
-
'हसीन दिलरुबा' हा लव्ह ट्रँगल पद्धतीचे कथानक असणारा चित्रपट असल्याच ट्रेलरवरुन स्पष्ट होतं आहे.
-
तापसीसोबत अभिनेता विक्रांत मैसी आणि हर्षवर्धन राणे चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.
-
चित्रपटामध्ये विक्रांत आणि तापसी हे विवाहित जोडपं दाखवण्यात आलं आहे.
-
या लव्ह स्टोरीमध्ये हर्षवर्धन तिसरा व्यक्ती म्हणून एन्ट्री करतो असं साधारण कथानक असल्याचा अंदाज बांधला जातोय.
-
'हसीन दिलरुबा' हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर, थ्रिलर लव्ह स्टोरी प्रकारातील आहे.
-
'हसीन दिलरुबा'च्या पोस्टरची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा या चित्रपटाच्या टिझरचीही सुरु आहे. या चर्चेमागील मुख्य कारण आहे तापसीने दिलेले बोल्ड सीन्स.
-
'हसीन दिलरुबा'च्या टीझरमध्येच तापसीने अनेक बोल्ड सीन्स दिल्याचं दिसून येत आहे.
-
तापसी मागील काही काळापासून तिच्या वेगळ्या कथानक असणाऱ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'रश्मि रॉकेट', 'लूट लपेटा'नंतर आता ती 'हसीन दिलरुबा'मुळे चर्चेत आहे.
-
तापसीने यापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून तिने चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे यासंदर्भातील माहिती दिली होती.
-
नुकताच तापसीने 'हसीन दिलरुबा'चा टीझर शेअर केला. आपल्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन टीझर शेअर करताना तापसीने 'प्यार के तीन रंग, खून के छींटों के संग', अशी कॅप्शन दिली आहे.
-
या टीझरवरुन तापसी, विक्रांत आणि हर्षवर्धन यांच्यावर आधारित अनेक बोल्ड सीन्स या चित्रपटामध्ये असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.
-
चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे प्रेम, रहस्य आणि त्यामधून होणारी फसवणूक याबद्दल असल्याचा प्राथमिक अंदाज चाहते बांधताना दिसत आहेत.
-
टीझरमधून हर्षवर्धनची भूमिकाही तापसी आणि विक्रांतइतकीच महत्वाची असल्याचं दिसून येत आहे.
-
हा चित्रपट दोन जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Photos: ‘प्यार के तीन रंग…’; तापसीने साकारलेली ‘हसीन दिलरुबा’ बोल्ड सीन्समुळे चर्चेत
तापसीने या चित्रपटाचा टीझर एक विचित्र अशी कॅप्शन देत शेअर केलाय, या टीझरमधील अनेक दृष्यांची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असल्याचं चित्र दिसतंय
Web Title: Taapsee pannu bold scenes from haseen dilruba teaser scsg