-
रुपेरी पडद्यावरची ग्लॅमरस आई म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांची आज जयंती.
-
७०-८० च्या दशकात रिमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरु केले.
-
एक अभिनेत्री म्हणून प्रत्येक माध्यमावर आपला प्रभाव टाकणाऱ्या रिमा यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडूनच मिळाला होता.
-
रिमा यांचे पूर्वाश्रमीचे नाव नयन भडभडे. त्यांची आई मंदाकिनी भडभडे याही अभिनेत्री होत्या.
-
पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थीदशेतच त्यांच्या अभिनयाची दखल घेतली गेली होती.
-
‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रिमा यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
-
कलयुग हा रिमा लागू यांचा पहिला हिंदी चित्रपट.
-
‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सासू माझी ढांसू’ यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले होते.
-
आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण, संजय दत्त, राहुल रॉय, गोविंदा ते अगदी जुही चावला, काजोल यांच्या आईच्या भूमिकेतही रिमा ठळकपणे लक्षात राहिल्या.
-
आपल्या वाट्याला आलेल्या आईच्या भूमिकेतही त्यांनी वैविध्य ठेवत आपली दखल घ्यायला भाग पाडले. (छाया सौजन्य : एक्स्प्रेस आर्काइव्ह)
रुपेरी पडद्यावरची ‘ग्लॅमरस आई’; रिमा लागूंविषयी काही खास गोष्टी
Web Title: Remembering reema lagoo on birth anniversary rare photos unknown facts information movies drama school family sdn