-
'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज अखेरचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
-
१९५५ मध्ये 'तराना' सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबाला यांची पहिली भेट झाली होती.
-
'तराना' या चित्रपटादरम्यान मधुबाला या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. असे म्हणतात की, मधुबाला आणि दिलीप कुमार यांनी जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. इतकेच नाही तर मधुबाला यांनी त्यांच्या मेकअप आर्टिस्टकडे गुलाब आणि उर्दुमध्ये लिहीलेले पत्र दिलीप कुमार यांना पाठवले.
-
या पत्रात असे लिहिले होते की, ‘जर तुम्हाला मी आवडते तर हे गुलाब स्वीकारा, नाही तर परत करा.’ दिलीप कुमार यांनी हे गुलाब स्वीकारले आणि इथून या दोघांची लव्हस्टोरीला सुरुवात झाली.
-
या सिनेमानंतर त्यांनी संगदिल, अमर आणि मुघल- ए- आझम सिनेमात एकत्र काम केले.
-
ऑनस्क्रीनसुद्धा या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
-
दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे ९ वर्षांचे नाते होते.
-
दोघांनी साखरपुडाही केला होता. पण साखरपुड्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही.
-
मधुबाला यांच्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
-
दिलीप कुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती.
-
मधुबालाच्या वडिलांनी दिलीप कुमार यांनी आपल्या मुलीला फसविल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
-
मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली झाला होता. बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ह्रदयाला छेद असल्यामुळे निधन झाले होते.
अधुरी एक कहाणी…. दिलीप कुमार आणि मधुबालाच्या नात्याची गोष्ट
Web Title: Tragedy king legendary actor dilip kumar madhubala love story romantic rare photos information movies sdn