-
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना 'बाई, बुब्स आणि ब्रा' अशी एक पोस्ट शेअर करत सुनावले होते.
-
तिच्या पोस्टला अनेकांनी पाठिंबा देत ट्रोलर्सला सुनावले.
-
दरम्यान हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
-
या व्हिडीओमध्ये गिलियन‘मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही’ असे बोलताना दिसत होती
-
त्यानंतर सोशल मीडियावर गिलियन विषयी चर्चा सुरु झाल्या.
-
गिलियन ही एक ब्रिटिश- अमेरिकन अभिनेत्री आहे.
-
तिने आजवर अनेक हॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द माइटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट.
-
तसेच तिने काही मालिकांमध्येही काम केले आहे.
-
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'द एक्स-फाइल्स' या मालिकेतील डॅना ही तिची भूमिका विशेष गाजली होती.
-
तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.
-
त्यानंतर तिने 'अमेरिकन गॉड', 'सेक्स एज्युकेशन', 'द क्राऊन' या सीरिजमध्ये काम केले आहे.
-
(All photos: Gillian Anderson Instagram)
‘स्तन बेंबीपर्यंत गेले तरी चालेल, पण ब्रा घालणार नाही’ असं म्हणणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टनंतर गिलियनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Web Title: Know about actress gillian anderson who said i do not care if my breasts reach my belly button said avb