-
गुलशन कुमार हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने नुकताच निर्णय सुनावला असून रौफ मर्चंटची शिक्षा कायम ठेवली आहे. सेशन कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. निर्माते रमेश तौरानी यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली आहे. कोर्टाला त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
-
१९५६ मध्ये दिल्लीत जन्मलेले गुलशन कुमार बालपणी आपल्या वडिलांसोबत ज्यूस विकण्याचं काम करत होते. यानंतर त्यांनी हळूहळू कॅसेट्सची विक्री सुरु केली. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि सुपर कॅसेट इंडस्ट्रीज नावाने कंपनी सुरु केली. हीच कंपनी पुढे जाऊन टी-सीरिज नावाने ओळखू जाऊ लागली. (Express Archive Photo)
-
आज ही कंपनी अनेक चित्रपटांची निर्मिती करत आहे. गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार सध्या ही कंपनी सांभाळत आहे. (Express Archive Photo)
-
गुलशन कुमार यांनी दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. (Express Archive Photo)
-
दिल्लीच्या दरियागंज परिसरात त्यांचे वडील चंद्रभान यांचं एक ज्यूसचं दुकान होतं. तिथे गुलशन कुमार त्यांच्यासोबत काम करायचे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
गुलशन कुमार आपल्या वडिलांनी दुकानात मदत करायचे. तिथूनच त्यांचा व्यवसायातील रस निर्माण झाला. (Express Archive Photo)
-
ज्यूसच्या दुकानात काम करत करत गुलशन कुमार यांना कंटाळा आला होता. अशामध्ये एक दिवस त्याच्या वडिलांनी एक दुकान खरेदी केलं जिथे स्वस्त कॅसेस्ट आणि गाण्याच्या रेकॉर्डिंग विकल्या जात होत्या. (Express Archive Photo)
-
पुढे जाऊन गुलशन कुमार यांनी नोएडामध्ये एक कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं. (Express Archive Photo)
-
गुलशन कुमार ओरिजिनल गाणी दुसऱ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करुन कमी पैशांमध्ये विकत होते. (Express Archive Photo)
-
अन्य कंपन्यांच्या कॅसेट २८ रुपयांमध्ये मिळत असताना गुलशन कुमार १५ तो १८ रुपयांत विक्री करत असत. (Express Archive Photo)
-
गुलशन कुमार यांनी कॅसेट बिझनेस कंपनीला 'सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज लिमिटेड' नाव दिलं होतं. (Express Archive Photo)
-
यावेळी त्यांनी भक्तीगीतं रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. यावेळी ते स्वत:देखील गाणी गात होते. (Express Archive Photo)
-
७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेट्सची मागणी वाढत गेली आणि ते म्युझिक इंडस्ट्रीमधील यशस्वी उद्योजकांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले. (Express Archive Photo)
-
ऑडिओ कॅसेट्समध्ये मिळालेल्या यशानंतर गुलशन कुमार यांनी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि मुंबईला आले. (Express Archive Photo)
-
यानंतर म्युझिक आणि बॉलिवूड चित्रपटांशिवाय ते हिंदू पौराणिक कथांशी संबंधित चित्रपट आणि मालिकांची निर्मितीदेखील करु लागले. (Express Archive Photo)
-
फिल्म इंडस्ट्रीत मिळालेल्या यशानंर गुलशन कुमार यांनी आपल्या कमाईतील एक भाग सामाजिक कार्यात खर्च करण्यास सुरुवात केली. (Express Archive Photo)
-
गुलशन कुमार यांना धार्मिक गोष्टींमध्ये फार रस होता आणि वैष्णोदेवीचे ते भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आयोजित केलेला भंडारा आजही चालवला जातो. (Photo/T-Series/YouTube)
-
गुलशन कुमार यांच्या या भंडाऱ्यात वैष्णोदेवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना निशुल्क अन्न दिलं जातं. असं सांगितलं जातं की, जेव्हा अबू सालेमने गुलशन कुमार यांना महिन्याला पाच लाख रुपये देण्यास सांगितलं होतं तेव्हा गुलशन कुमार यांनी नकार देत तितकेच पैसे वैष्णोदेवीच्या भंडाऱ्यात दान केले.
-
१२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतल्या अंधेरीत जितेश्वर महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेल्या गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. (Express Archive Photo)
-
या हत्येमागे नदीम-श्रवण या संगीत दिग्दर्शक जोडीतील नदीम यांचा हात होता असा आरोप झाला. (Express Archive Photo)
गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी भारतात अब्दुल रौफ दाऊद मर्चंटला अटक करण्यात आली. एप्रिल २००२ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) -
गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा १९ वर्षांचा मुलगा भूषण कुमारवर टी-सीरिज कंपनी सांभाळण्याची जबाबदारी आली. (Express Archive Photo)
-
भूषण कुमारने १३ फेब्रुवारी २००५ रोजी मॉडेल आणि अभिनेत्री दिव्या खोसलासोबत लग्न केलं. जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात दोघांनी लग्न केलं. (File Photo)
-
टी-सीरिजचा व्यवसाय २४ देशांमध्ये पसरला आहे. (Express Archive Photo)
सध्या भूषण कुमार टी-सीरिज कंपनी सांभाळत असून अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 'रेडी' (२०११), 'आशिकी २' (२०१३), 'हेट स्टोरी ४' (२०१४), 'बेबी' (२०१५), 'भाग जॉनी' (२०१५), 'एयरलिफ्ट' (२०१६), 'बादशाहो' (२०१७) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. (File Photo)
कधी काळी वडिलांसोबत रस्त्यावर ज्यूस विकायचे गुलशन कुमार; कॅसेट्स विकू लागले आणि झाले करोडपती
Web Title: Indian businessman t series gulshan kumar sold juice cassette on road read interesting facts information rare photos sdn 96 sgy