• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about balumama chya navan chang bhala fame sumeet pusavale real life information movies tv serial photos sdn

मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेबद्दल काही खास गोष्टी

July 23, 2021 10:49 IST
Follow Us
  • Balumama Chya Navan Chang Bhala Sumeet Pusavale Information Photos
    1/21

    सध्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथानक असलेल्या मालिकांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय.

  • 2/21

    छोट्या पडद्यावरील सध्याच्या घडीला आघाडीवर असलेली मालिका म्हणजे 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'.

  • 3/21

    संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

  • 4/21

    बाळूमामांच्या प्रपंच, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना मालिकेतून घडत आहे.

  • 5/21

    या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 6/21

    कोल्हापुरातील दिघंजी येथे सुमीतचा जन्म झाला.

  • 7/21

    पुणे विद्यापीठात त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं.

  • 8/21

    शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तीन वर्षे विविध हॉटेल मॅनेटमेंज कंपन्यांमध्ये काम केलं.

  • 9/21

    मात्र अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देईना.

  • 10/21

    लहानपणापासूनच त्याला अभिनयाचं वेड होतं.

  • 11/21

    अभिनयाच्या वेडापायी सुमीतने नोकरी सोडली आणि मॉडेलिंग केलं.

  • 12/21

    'सरगम' या चित्रपटातून सुमीतने पदार्पण केलं.

  • 13/21

    'सरगम' या चित्रपटात त्याने दिग्गज अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम केलं.

  • 14/21

    २०१८ मध्ये सुमीतने 'लागीरं झालं जी' या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती.

  • 15/21

    'लागीरं झालं जी' या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.

  • 16/21

    'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेत त्याने महाडिक राजे यांची भूमिका साकारली होती.

  • 17/21

    सुमीतने नाटकातही काम केलंय.

  • 18/21

    अभिनय क्षेत्रात नाम कमावणाऱ्या सुमीने बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही काम केलंय.

  • 19/21

    मराठी मालिकांमध्ये काम करण्याआधी सुमीतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

  • 20/21

    प्रियांका चोप्राच्या एका चित्रपटासाठी सुमीतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

  • 21/21

    (सर्व फोटो सौजन्य : सुमीत पुसावळे / इन्स्टाग्राम)

Web Title: Know about balumama chya navan chang bhala fame sumeet pusavale real life information movies tv serial photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.