-
टीव्ही मालिकांचा TRP जितका चांगला, तितका काळ ती मालिका सुरु राहते. पण TRP घसरला की, त्या मालिकेचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात होते. झी मराठी वाहिनीवरील तीन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडच्या रुपेरी पड्यावरदेखील मोठं यश मिळवलं. मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. झी मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
-
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच 'मन झालं बाजिंद' या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.
-
एक नवीन गूढ रहस्यमय मालिका १६ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, मालिकेचं नाव आहे 'ती परत आलीये'. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.
-
राजकारणावर प्रेम करणारा, पण प्रेमात कधीही राजकारण न आणणारा 'कारभारी लयभारी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अभिनेता निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकाते ही जोडी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
-
लोकप्रिय मालिका 'अग्गंबाई सूनबाई' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या मालिकेची अफाट लोकप्रियता पाहायला मिळते. दरवेळी सासू-सुनेचं भांडण असणारी मालिका साऱ्यांनीच पाहिली. परंतु, या मालिकेत सासूला पाठिंबा देणारी सून पाहायला मिळाली.
-
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'देवमाणूस' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
‘झी मराठी’च्या प्रेक्षकांसाठी बातमी, तीन लोकप्रिय मालिका होणार बंद?
Web Title: Zee marathi these three popular tv serial will go off air know about upcoming serial information sdn