-
पती राज कुंद्रामुळे सध्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही चांगलीच चर्चेत आहे.
-
पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली असून सध्या पोलीस कोठडीत आहे.
-
पतीच्या अटकेनंतर शिल्पा 'सुपर डान्सर चॅप्टर ४' या शोमध्येही दिसत नाही. पण यामुळे शिल्पाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
-
शिल्पाच्या ऐवजी सध्या काही पाहुणे कलाकार 'सुपर डान्सर चॅप्टर ४' या शोमध्ये पहायला मिळतायेत.
-
'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर चॅप्टर ४'च्या एका एपिसोडसाठी जवळपास १८ ते २२ लाख रुपये मानधन घेते.
-
सध्या शोपासून लांब असल्यामुळे शिल्पा शेट्टीचे जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
-
शिल्पा शोमध्ये लवकर परतणार असल्याची आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी 'सुपर डान्सर चॅप्टर ४'मध्ये शिल्पाच्या जागी अभिनेत्री रवीना टंडनला विचारण्यात आले होते. पण रवीनाने नकार दिल्याचे समोर आले. रवीनाला नकार देण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीना म्हणाली, 'हा शो शिल्पाचाच असेल आणि तिलाही शोमध्ये काम करायला आवडेल.' रवीना सध्या परदेशात आहे. ती ऑगस्ट महिन्यात भारतात परत येणार आहे.
-
संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शिल्पा शेट्टी ही शोचा एक महत्वाचा भाग होती आणि लवकरच ती शोमध्ये पुन्हा येईल अशी आशा करुया. तो पर्यंत गीता कपूर आणि अनुराग बासू हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार दिसणार आहेत.'
-
(सर्व छायाचित्र सौजन्य – शिल्पा शेट्टी / इन्स्टाग्राम)
पॉर्नमधून कमावला बक्कळ पैसा, पण राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीचं कोट्यवधींचं नुकसान
Web Title: Raj kundra porn case bollywood actress shilpa shetty to face financial losses approximately rs 2 crore super dancer 4 judge sdn