-
आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे.
-
‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘अंधाधून’ या चित्रपटांच्या माध्यमातून राधिकाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
-
त्यामुळे तिची लोकप्रियता केवळ देशातच नाही तर विदेशापर्यंत पोहोचली आहे.
-
तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत.
-
राधिकाने नेहा धुपियाच्या बीएफएफ व्हिथ वोग या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
तिच्या सोबत अभिनेता राजकुमार राव देखील उपस्थित होता.
-
दरम्यान राधिकाने तिला एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी फोनवर अश्लील गोष्टी करव्या लागल्याचे सांगितले.
-
इतकं करुनही राधिकाची त्या चित्रपटासाठी निवड करण्यात आली नाही.
-
'देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अश्लील गोष्टी करण्यास सांगण्यात आले. मी ते केलं देखील. कारण मला त्या चित्रपटासाठी सिलेक्ट व्हायचे होते. मी उत्तम अभिनय केला. पण तरीही माझी निवड करण्यात आली नाही' असे राधिका म्हणाली.
-
यापूर्वी ‘ग्रेझिया मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राधिकाने न्यूड क्लिप व्हायरल झाली तेव्हा तिच्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत अनेकांनी पाहिली होती असे सांगितले होते.
-
‘Clean, Shaven चित्रपटाच्या वेळी जेव्हा माझी न्यूड क्लिप लीक झाली होती तेव्हा मी प्रचंड ट्रोल झाले होते. मी चार दिवस घराबाहेर पडले नव्हते. मीडिया माझ्या विषयी काय बोलत आहे म्हणून नाही तर माझा ड्रायव्हर, वॉचमॅन आणि स्टायलिस्ट माझ्याविषयी काय विचार करत असतील याचा विचार करुन मी बाहेर पडले नाही’ असे राधिका म्हणाली होती.
-
पुढे ती म्हणाली होती, ‘जे फोटो व्हायरल झाले होते त्यामध्ये मी नाही असा अनेकांनी अंदाज लावला असेल. मला असे वाटत नाही की एखादी व्यक्ती असे करु शकेल किंवा करु ही शकते. या कडे दुर्लक्ष करायला हवे. याकडे लक्ष देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे.’
-
(All Photos: Radhika Apte Instagram)
‘चित्रपटाच्या ऑडिशनसाठी कराव्या लागल्या होत्या फोनवर अश्लील गोष्टी तरीही…’, राधिका आपटेचा खुलासा
Web Title: Adhika apte had have phone sex for dev d movie audition but still rejected avb