-
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो, व्हिडिओज, ट्विट्स, ऑनलाइन ब्लॉग्स यांच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते.
-
छोट्या पडद्यावर 'नागिन' या मालिकेमुळे अभिनेत्री मौनी रॉय घराघरात पोहोचली.
-
मालिकांसोबतच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत मौनीने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. मौनी रॉयने 'गोल्ड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून मौनीने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिने काही रिअॅलिटी शोमध्येही सहभागी होत प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
मौनीने 'पती पत्नी और वो', 'दो सहेलिया' आणि 'शsss फिर कोई है' या मालिकांतून अभिनय करत टेलिव्हिजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं. 'देवों के देव महादेव' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.
-
सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत मौनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
-
मौनीने परिधान केलेल्या हिरव्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
या फोटोंमध्ये मौनीने साडीवर ब्लाउज परिधान केलेला नाही.
-
मौनीचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
सौंदर्य आणि मादकता याची केमिस्ट्री या फोटोंमध्ये दिसून येतेय. सोशल मीडियावरही मौनीचे लाखो चाहते आहेत. (सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय / इन्स्टाग्राम)
मौनी रॉयने ब्लाऊजविना नेसली बनारसी साडी; सौंदर्यावर नेटकरी फिदा
Web Title: Bollywood actress mouni roy latest photoshoot without blouse green banarasi saree hot bold photos sdn