Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from salim khan to kadar khan bollywood stars have a special relationship with afghanistan srk

कादर खान ते सलीम खान; ‘या’ बॉलिवूड स्टार्सचे आहे अफगाणिस्तानशी खास नाते

अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे

August 18, 2021 19:21 IST
Follow Us
  • Bollywood stars have a special relationship with Afghanistan
    1/7

    तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे, त्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. तेथून लोक देशाबाहेर पळून जात आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी आधीच देश सोडून पळून गेले आहेत. या संकटाच्या काळात कोणताही देश अफगाणिस्तानच्या मदतीसाठी पुढे आला नाही.

  • 2/7

    दरम्यान, फार कमी लोकांना माहित आहे की अफगाणिस्तान आणि बॉलिवूडचे खूप जुने नाते आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झाले आहे. पण आज आम्ही बोलणार आहोत त्या बॉलिवूड स्टार्स बद्दल जे अफगाणिस्तानचे आहेत. 

  • 3/7

    सलीम खान- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान हे अफगाणिस्तानचे आहेत. त्यांचे पणजोबा पूर्वी अफगाणिस्तानमध्ये राहत होते. त्यावेळी अफगाणिस्तानात बरीच युद्धे झाली. त्यामुळे त्यांचे पूर्वज अफगाणिस्तान सोडून भारतात आले.

  • 4/7

    कादर खान- आपल्या दमदार अभिनयाने आणि कॉमेडीने करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे कादर खान एक अफगाणी होते. त्यांचा जन्म काबुल, अफगाणिस्तान येथे झाला. काही काळानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 

  • 5/7

    फिरोज खान- दिवंगत बॉलिवूड अभिनेता फिरोज खानचेही अफगाणिस्तानशी खास नाते होते. फिरोज हे अफगाणिस्तानचे पठाण होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गझनी येथे राहत होते. नंतर त्यांचे वडील गझनीहून भारतात आले आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाले.

  • 6/7

    संजय खान- फिरोज खानचा धाकटा भाऊ आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय खान देखील एक अफगाणी आहे. त्याचे पूर्वज अफगाणिस्तानात राहत होते, नंतर ते लोक भारतातही स्थायिक झाले.

  • 7/7

    वारिना हुसैन- लव्ह यात्री चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वारिना हुसेन देखील अफगाणिस्तानची आहे. तीचा जन्म काबुलमध्ये झाला. वारिनाने आधी मॉडेलिंग केले आणि नंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

TOPICS
मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From salim khan to kadar khan bollywood stars have a special relationship with afghanistan srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.