-
आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून बॉलिवूड सेलिब्रीटी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेल्याचे आपण पाहतो. मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी मालदीवला जात आहेत. तिथून ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना अपडेट देत असतात. (सर्व छायाचित्र सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि अभिनेता रोहित रेड्डी यांची जोडी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत.
-
अनिता हसनंदानी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली आहे.
-
९ फेब्रुवारी रोजी अनिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अनिता आणि रोहितने त्यांच्या बाळाचं नाव आरव असं ठेवलं आहे.
-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
या फोटोत सैफ आणि करीना स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.
-
२१ फेब्रुवारी रोजी करीना दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला.
-
सनाने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला असला तरी ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
सना खान आणि अनस सय्यद सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेले आहेत.
-
लग्नाआधी ग्लॅमरस अंदाजात झळकणाऱ्या सनाचं रुप पालटलंय. असं असलं तरी हिजाब परिधान करून सना पतीसोबत तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सध्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मालदिव इथे गेली आहे.
-
मालदिवमध्ये मोनालिसासोबत पती विक्रांतसुद्धा आहे.
-
या फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर मौनीने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
-
मौनीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
-
'मेरी आशिकी तुमसे ही' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री स्मृती खन्ना कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
स्मृतीने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री मुक्ती मोहनने मालदीव इथे सुट्ट्यांचा आनंद घेतला.
-
मालदीवच्या निर्सगरम्य किनाऱ्यावरचा हा सुंदर फोटो.
चलो मालदिव… करीना ते मौनी रॉय; सेलिब्रिटींचे हे खास व्हेकेशन फोटो पाहिलेत का?
Web Title: List of bollywood celebrities who visited maldives vacation recently with family kareena kapoor khan mouni roy beautiful photos sdn