-
झी मराठीवर वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.
-
मालिकेच्या पहिल्या भागापासून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे.
-
श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या दिग्गज कलाकारांसोबतच परी म्हणजेच मायरा वैकुळ ही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
मायरा ही महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.
निखळ आणि मस्तीखोर स्वभावामुळे तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. -
सध्या नेटकऱ्यांकडून मायरावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला जात आहे.
-
मालिका सुरु होण्याच्या आधीपासून मायराचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
-
‘आहे परी तर डोन्ट वरी’ असं म्हणत आपल्या निरागस अभिनयाने मायराने प्रेक्षकांचं टेन्शन दूर करत त्यांच्या मनात एक अढळ स्थान बनवलं आहे.
-
मालिकेतील परीचा निरागसपणा प्रेक्षकांना भावतोय.
-
परी ही सगळ्यांना आपल्यातील एक वाटत असल्याने अनेक चाहते तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य- मायरा वैकुळ/ इन्स्टाग्राम)
“सुंदर निरागस हे रुप तुझे…”, परीचा हटके अंदाज
मालिका सुरु होण्याच्या आधीपासून मायराचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
Web Title: Marathi serial mazhi tuzhi reshimgaath pari fame myra new photoshoot nrp